शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

CoronaVirus News: कोरोनाबाधिताकडून किती वेळात होतो विषाणूचा फैलाव?; धक्कादायक माहितीनं चिंतेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 20:42 IST

CoronaVirus News: ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समधील धक्कादायक प्रकार

कॅनबेरा: कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत अतिशय झपाट्यानं वाढ होत आहे. त्यातच आता कोरोना फैलावाचा वेग आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे तज्ज्ञांसह सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीकडून अवघ्या एका दिवसात कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. देशानं कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. मात्र न्यू साऊथ वेल्समध्ये सापडलेल्या एका रुग्णामुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. या रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली, याची माहिती उपमुख्य वैद्यकीय अधिकारी मायकल किड्ड यांनी दिली नाही. मात्र या व्यक्तीच्या शरीरात सापडलेला कोरोना विषाणू अतिशय सक्रिय असल्याचं त्यांनी सांगितलं. संबंधित रुग्णाच्या शरीरात सापडलेला कोरोना विषाणू अतिशय वेगानं संक्रमित होत असल्याची माहिती किड्ड यांनी दिली. हा प्रकार असामान्य आहे. मात्र अशक्य नाही, असं त्यांनी सांगितलं. याबद्दलची माहिती देताना किड्ड यांनी सामान्य कोरोना विषाणू आणि न्यू साऊथ वेल्समधल्या शरीरातल्या कोरोना विषाणूची तुलना केली. 'सर्वसाधारणे कोरोनाची लागण झाल्यानंतर माणसाच्या शरीरात पाच ते सात दिवसांत कोरोनाची लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं स्पष्टपणे दिसू लागण्याच्या एक ते दोन दिवस आधी त्याच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग सुरू होतो,' असं किड्ड यांनी सांगितलं.न्यू साऊथ वेल्समध्ये सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या शरीरात आढळलेला कोरोना विषाणू वेगळा आहे. त्याच्या शरीरात शिरकाव केलेला विषाणू २४ तासांच्या आतच संपर्कात आलेल्यांच्या शरीरात प्रवेश करतो आणि मग फैलावाला सुरुवात होते, अशी माहिती किड्ड यांनी दिली. कोरोना विषाणूचं स्वरूप बदलत असल्याचा हा पुरावा असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक व्यक्तीचं शरीर विविध पद्धतीनं कोरोनाला सामोरं जातं, हे यातून दिसून आल्याचं ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या