शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्येच्या बाबतीत मागे पडल्यानंतर चीनने सिंगल वुमनसाठी घेतला 'हा' निर्णय, जगभरात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 11:15 IST

UNFPA च्या अहवालानुसार देशाची लोकसंख्या आता 142.86 कोटींवर पोहोचली आहे. तर चीनची लोकसंख्या 142.57  कोटी आहे.

चीनला मागे टाकत भारत पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. UNFPA च्या अहवालानुसार देशाची लोकसंख्या आता 142.86 कोटींवर पोहोचली आहे. तर चीनची लोकसंख्या 142.57  कोटी आहे. दरम्यान, आता चीनला आपल्या देशाच्या घटत्या लोकसंख्येची चिंता  वाटत असल्याने नवीन योजनेचा आदेश शी जिनपिंग सरकारने दिला आहे. ज्यामध्ये महिलांना मुलांना जन्म देण्यासाठी सर्व प्रकारची सूट देण्यात आली आहे. बीजिंगमधून देशाचा कारभार पाहणाऱ्या शी जिनपिंग यांनी सिचुआन प्रांतासाठी घेतलेला निर्णय आणि देशाच्या उर्वरित भागात विविध योजना राबविल्या जात आहेत, आता संपूर्ण देशात लागू करण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये आतापर्यंत केवळ विवाहित जोडप्यांना पगारी रजा आणि अपत्य अनुदान मिळण्याचा अधिकार होता. मात्र आता सरकारने सिंगल वुमनसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. 'द इंडिपेंडंट'च्या वृत्तानुसार, चीन सरकारने फेब्रुवारीमध्ये सिचुआन प्रांतातील अविवाहित महिलांना मुले जन्माला घालण्यासाठी नोंदणी करण्याच्या नियमाला कायदेशीर मान्यता दिली. याचा सरळ अर्थ असा की, आता अविवाहित चिनी महिलांना गरोदर राहिल्यानंतर पगारी रजा आणि अपत्य अनुदान मिळू शकते. काही महिला या नवीन योजनेबद्दल खूप उत्सुक आहेत तर काही महिलांनी तर नोंदणीही केली आहे.

चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे तर वृद्धांची लोकसंख्या वाढली आहे. अशा स्थितीत चीन सरकार आपल्या वर्क फोर्समध्ये कमतरता होण्याची शक्यता दूर करण्यासाठी झटपट निर्णय घेत आहे. गेल्या महिन्यात चीनच्या सरकारी कौशल्य केंद्रात शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्यांना निसर्गाच्या कुशीत आपला जीवनसाथी मिळावा, यासाठी एका आठवड्याची विशेष सुट्टी देण्यात आली होती. असे आणखी काही निर्णय घेतले गेले आहेत जेणेकरून लोकांना मुले होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. पण लाखो तरुण चिनी लोक लग्न आणि मुलाच्या संगोपनाच्या खर्चामुळे मुले होण्यास टाळाटाळ करत आहेत.

चीनी आयव्हीएफ सेक्टमध्ये होणार वाढचिनी मीडियाच्या रिपोर्टनुसार, सध्या देशात 539 खाजगी आणि सरकारी आयव्हीएफ क्लिनिक आहेत. शी जिनपिंग यांच्या प्रशासनाला येत्या दोन वर्षांत म्हणजे 2025  पर्यंत दर 25 लाख लोकांमागे एक आयव्हीएफ क्लिनिक उघडायचे आहे. यासह, 2025 पर्यंत चीनमधील आयव्हीएफ मार्केट 85 बिलियन युआनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, शी जिनपिंग सरकारच्या या निर्णयावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :chinaचीन