शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रक्कामधील सीरियन नागरिकांचे रक्षण करा : संयुक्त राष्ट्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 14:43 IST

रक्का शहरामध्ये दहा ते 25 हजार लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे शहर इसिसच्या बालेकिल्ल्यांपैकी एक आहे. मात्र नक्की किती लोक तेथे अडकलेले आहेत याची माहिती तेथील युद्ध परिस्थितीमुळे स्पष्ट झालेले नाही

ठळक मुद्देइस्लामिक स्टेट विरोधात लढणाऱ्या सीरियन डेमोक्रॅटिक दलांनी रक्का शहरामध्ये दोन महिन्यांपुर्वी प्रवेश केलारक्कामधील युद्धामुळे हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.

युनायटेड नेशन्स, दि.10- सीरियातील रक्का प्रदेशात अडकून पडलेल्या लोकांबद्दल काळजी व्यक्त करत संयुक्त राष्ट्राने या लोकांचे संरक्षण करण्याची विनंती तेथे लढणाऱ्या दलांना केली आहे. सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांनी लक्षात ठेवावी असेही संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

रक्का शहरामध्ये दहा ते 25 हजार लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे शहर इसिसच्या बालेकिल्ल्यांपैकी एक आहे. मात्र नक्की किती लोक तेथे अडकलेले आहेत याची माहिती तेथील युद्ध परिस्थितीमुळे स्पष्ट होत नसल्याचे संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन डुजॅरिक यांनी सांगितले. सध्या रक्का येथे संयुक्त राष्ट्राला पोहोचण्यात अडथळे येत असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले. येथे अडकलेल्या लोकांना संरक्षण करण्याच्या जबाबदारीची जाणिव आम्ही लष्करी दलांना करुन देतो आणि मानवतावादी दृष्टीकोनातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी देण्यात यावी असे स्टीफन यांनी स्पष्ट केले. जुलै महिन्यामध्ये रक्का प्रदेशातील 46 शहरांमध्ये राहणाऱ्या 2 लाख 63 हजार नागरिकांना मानवतावादी संघटनांनी अन्न, औषधे यांचे वाटप केले आहे.

इस्लामिक स्टेट विरोधात लढणाऱ्या सीरियन डेमोक्रॅटिक दलांनी रक्का शहरामध्ये दोन महिन्यांपुर्वी प्रवेश केला. पण इसिसच्या प्रखर विरोधामुळे त्यांना फारशी प्रगती करता आलेली नाही. रक्कामधील युद्धामुळे हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसला अमेरिकेने मदत पुरवली असून इसिसविरोधात लढण्यासाठी ही दले काम करत आहेत. अमेरिकेने या दलांना युद्धसामुग्रीही पुरवलेली आहे.

17 इंडोनेशियन नागरिक पुन्हा मायदेशीरक्कामध्ये इसिसला मदत करण्यासाठी आलेले इंडोनेशियाचे 17 लोक पुन्हा घरी गेल्याची माहिती स्थानिक कुर्दी व्यवस्थेच्या प्रवक्त्याने दिली. या लोकांना सीरिया आणि इराकसीमेवर पाठवण्यात आले आणि तेथून ते पुन्हा इंडोनेशियाला गेल्याचे सांगण्यात आले.

2 आर्मेनियन कुटुंबांची सुटकासीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसनी (एसडीएफ) सात ख्रिश्चन कुटुंबांना रक्कामधून सुरक्षीत वाचवल्याची माहिती दिली असून त्यामध्ये 2 आर्मेनियन कुटुंबे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एसडीएफचे माहिती कार्यालयाचे संचालक मुस्तफा बली यांनी ही माहिती दिली आहे. रक्कामध्ये ख्रिश्चन समुदायही अल्प प्रमाणात राहातो.