शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

"एक रहा अन्यथा मरा'! ऋषी सुनक यांचा पंतप्रधान होताच पक्षातील खासदारांना मोठा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 14:51 IST

42 वर्षीय सुनक हे गेल्या दोन शतकांतील ब्रिटनचे सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान आहेत.

ब्रिटनमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू असताना पंतप्रधान म्हणून निवडल्या गेलेल्या ऋषी सुनक यांनी आपल्या कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांना मोठा संदेश दिला आहे. सुनक यांनी आपल्या खासदारांना 'एक रहा अन्यथा मरा' या मंत्रावर काम करण्याचा संदेश दिला आहे. मंगळवारी झालेल्या कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या मिटिंगमध्ये सुनक बोलत होते.

महत्वाचे म्हणजे, 42 वर्षीय सुनक हे गेल्या दोन शतकांतील ब्रिटनचे सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान आहेत. यातच गमतीशीर गोष्ट म्हणजे, चर्चिल यांच्यानंतर, ते ब्रिटनचे सर्वात कमी उंची असलेले पंतप्रधान असतील. त्यांची उंची 5 फुट 6 इंच एढी आहे. किंग चार्ल्स तृतीय यांच्या भेटीनंतर ते पंतप्रधान म्हणून आपला कारभार सांभाळतील.

काही महिन्यांतच तिसरे पंतप्रधान - ब्रिटनची अर्थव्यवस्था रुळावरून घसरवल्याच्या आरोपांचा सामना करत असलेल्या लिझ ट्रस या सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पंतप्रधान बनल्या होत्या. पण मंगळवारी त्या आपल्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेणार आहेत. यानंतर त्या किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतल्यानंतर, आपले पद सोडतील. या बैठकीनंतर, ऋषी सुनकही किंग चार्ल्स यांची भेट घेतील. 

लिझ ट्रस यांनी गुरुवारी राजीनामा दिल्यापासूनच सुनक यांचे नाव चर्चेत होते. त्यांच्या सोबतच बोरिस जॉन्सन आणि पेनी मोरडॉन्ट यांच्या नावाचीही चर्चा होती. पण शेवटी, दोघेही रेसमधून बाहेर पडले आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावावर मोहर लागली.

सुनक यांच्या समोर अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आव्हान - पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर ऋषी सुनक आपल्या भाषणात म्हणाले, स्थिर आणि एकसंध पंतप्रधान हे आपले प्राधान्य असेल. पण, कंझर्व्हेटिव्ह पक्षाला एकत्रित ठेवणे सुनक यांच्यासाठी सोपे नाही. ब्रिटनची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पट्रीवर आणणे अवघड काम आहे. यामुळेच लिझ ट्रस यांनाही आपली खुर्ची गमवावी लागली आहे. ब्रिटनमध्येही निवडणुकीचीही मागणी होत होती, पण टोरी पक्षाने सुनक यांच्यावर विश्वास दर्शवला. सध्याचा संसदेचा कार्यकाळ जानेवारी 2025 पर्यंत आहे. या काळात काही अनपेक्षित घडले नाही, तर सुनक हे पुढील तीन वर्ष ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर राहतील. 

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकEnglandइंग्लंडprime ministerपंतप्रधान