लंडन : घरांचे भाव आकाशाला भिडत असताना लोक उपलब्ध जागेत वा कमीतकमी जागेत जास्तीतजास्त सोयी सुविधा करायचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न येथील एकाने केला. त्याने आपले घर विकायची जाहिरात दिली. या घराचे वैशिष्ट्य असे की येथील मालमत्तांच्या भावापेक्षा ते खूपच स्वस्त आहे व त्यात जागेचा खूप विचार करून उपयोग केला गेला आहे. मात्र यात एक अडचण आहे त्यामुळे लोक हे घर घ्यायला तयार नाहीत. या घरात पलंगाला लोखंडी साखळ््यांनी छताला लटकवण्यात आले आहे. पण चारही बाजुंना सामान असल्यामुळे शिडी लावायला जागाच उरलेली नाही. सध्या या आगळ््यावेगळ््या घराची चर्चा सगळ््या इंग्लंडमध्ये आहे.
हवेत लटकणाऱ्या पलंगाचे अनोखे घर
By admin | Updated: April 5, 2017 05:04 IST