शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

संयुक्त राष्ट्रानं उत्तर कोरियावर लादले कडक निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 16:03 IST

अमेरिकेच्या दबावाला न जुमानता सातत्यानं अण्वस्त्र चाचणी करणा-या उत्तर कोरिया या देशावर संयुक्त राष्ट्रानं कडक निर्बंध लादले

ठळक मुद्देअमेरिकेच्या दबावाला न जुमानता सातत्यानं अण्वस्त्र चाचणी करणा-या उत्तर कोरिया या देशावर संयुक्त राष्ट्रानं कडक निर्बंध लादलेसंयुक्त राष्ट्रानं उत्तर कोरियाच्या निर्यातीवर प्रतिबंध घातल्यामुळे प्योंगयांगला वर्षाकाठी जवळपास 1 अब्ज डॉलर मुकावं लागणार आहे. प्रस्तावानुसार मासे व समुद्री खाद्यपदार्थ, कोळसा, लोह इत्यादींच्या निर्यातीवर निर्भर असलेल्या उत्तर कोरियाला आता निर्यात करता येणार नाही.

संयुक्त राष्ट्र, दि. 6 - अमेरिकेच्या दबावाला न जुमानता सातत्यानं अण्वस्त्र चाचणी करणा-या उत्तर कोरिया या देशावर संयुक्त राष्ट्रानं कडक निर्बंध लादले आहेत. उत्तर कोरियावर कडक प्रतिबंध लादण्यासाठी अमेरिकेनं एक प्रस्ताव तयार करून संयुक्त राष्ट्रात ठेवला होता. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रानं सर्व देशांच्या संमतीनं मंजुरी दिली आहे. उत्तर कोरियानं लागोपाठ घेतलेल्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रानं उत्तर कोरियावर कडक निर्बंध घातले आहेत. तसेच उत्तर कोरियातून होणा-या निर्यातीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्रानं उत्तर कोरियाच्या निर्यातीवर प्रतिबंध घातल्यामुळे प्योंगयांगला वर्षाकाठी जवळपास 1 अब्ज डॉलरला मुकावं लागणार आहे.डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाविरोधात एवढं कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे. प्रस्तावानुसार मासे व समुद्री खाद्यपदार्थ, कोळसा, लोह इत्यादींच्या निर्यातीवर निर्भर असलेल्या उत्तर कोरियाला आता निर्यात करता येणार नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. जर सर्व देशांनी हे प्रतिबंध पाळल्यास उत्तर कोरियाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. चीनसोबत जवळपास एका महिन्याच्या चर्चेनंतर अमेरिकेनं या प्रस्तावाचा मसुदा तयार केला आहे. चीन हा उत्तर कोरियाचा सर्वात मोठा व्यापारी सहयोगी आहे. 4 जुलै रोजी उत्तर कोरियानं केलेल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल परीक्षण घेतल्यानंतर हा प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी 28 जुलै रोजी उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टिक मिसाइल परीक्षण केलं. संयुक्त राष्ट्रानं 2006 पासून आतापर्यंत उत्तर कोरियावर जवळपास सात वेळा निर्बंध लादले आहेत. मात्र या प्रस्तावानंतर उत्तर कोरियाच्या भूमिकेत कोणताही फरक पडलेला दिसला नाही. उत्तर कोरिया लवकरच मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्याच्या तयारीत आहे. आम्ही बनवणा-या मिसाइल जपानवर हल्ला करण्यासाठी सक्षम असून, या मिसाइल अमेरिकन सेनेच्या मुख्य ठिकाणांनाही लक्ष्य करणार असल्याचं उत्तर कोरियानं म्हटलं होतं. उत्तर कोरियानं गेल्या आठवड्यात मिसाइल परीक्षण केलं असून, एका आठवड्यात उत्तर कोरियानं दोनदा मिसाइल परीक्षण केलं होतं. सॉलिड-फ्यूल पुकगुकसॉन्ग-2 मिसाइलनं चाचणीदरम्यान 500 किलोमीटरचे अंतर पार करत 560 किलोमीटर उंचावरून मारा केला होता. त्यानंतर मिसाइल प्रशांत महासागरात प्रवेशकर्ती झाली. या मिसाइलचं परीक्षण किम जोंग ऊन यांच्या देखरेखीखाली झालं. किम जोंग उन हे या मिसाइल परीक्षणामुळे संतुष्ट असून, या प्रकारच्या मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं, असं वृत्त एका स्थानिक वृत्तसंस्थेनं दिलं होतं. KCNAच्या मते, या मिसाइलची लक्ष्य भेदण्याची क्षमता अचूक असून, सॉलिड-फ्यूल पुकगुकसॉन्ग-2 मिसाइलनं आमचं सर्वात यशस्वी सामरिक शस्त्र असल्याचं ते म्हणाले होते.