शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जेरुसलेमच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिका एकाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 11:56 IST

डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुदायातही उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देअमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी निकी हॅले यांनी अमेरिकेची बाजू बैठकीमध्ये जोरदारपणे मांडली. संयुक्त राष्ट्र हे इस्रायलचा द्वेष करणारे एक केंद्र बनलेले आहे. असे सांगत हॅले यांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले.

न्यू यॉर्क- डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुदायातही उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे दिसून आले. जेरुसलेमला अशी मान्यता दिल्यास मध्य-पूर्वेत तणाव वाढू शकेल अशी भीती अनेक राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.अमेरिकेने जेरुसलमेला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर सुरक्षा परिषदेतील 15 पैकी 8 सदस्य राष्ट्रांनी याबाबत तात्काळ बैठक घेण्याची मागणी केली होती. या देशांनी जगभरातील शांतता व सुरक्षेची स्थिती बिघडण्याची भीती व्यक्त करत ही बैठकीची मागणी केली होती.जेरुसलेमच्या दर्जाबाबत पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यामधील वाटाघाटींमधूनच उपाय निघाला पाहिजे असे पाच युरोपीय देशांनी या बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जेरुसलेम ही इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोहोंची राजधानी असल्यामुळे त्यांच्यामध्ये होणाऱ्या वाटाघाटींनीच यावर वास्तवावादी तोडगा निघू शकतो. तसे झाल्याशिवाय युरोपियन युनियन जेरुसलेमच्या सार्वभौमत्त्वाला मान्यता देऊ शकत नाही असे या निवेदनात युरोपियन देशांनी स्पष्ट केले आहे.

मात्र अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी निकी हॅले यांनी अमेरिकेची बाजू बैठकीमध्ये जोरदारपणे मांडली. गेली अनेक वर्षे संयुक्त राष्ट्र हे इस्रायलचा द्वेष करणारे एक केंद्र बनलेले आहे. असे सांगत हॅले यांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले. तर बैठकीच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्राचे मध्य-पूर्वेतील विशेष प्रतिनिधी निकोलाय म्लादेनोव्ह यांनी अमेरिकेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या कृतीमुळे भविष्यातील धोक्याबाबत भीती व्यक्त केली. यामुळे हिंसक घटना घडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयUSअमेरिकाAmericaअमेरिकाIsraelइस्रायल