Russia Kazan Attacked, Ukrainian drones: अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण 9/11 हल्ल्याची आठवण जगाला करून देणारा भीषण हल्ला रशियातील कझान शहरात झाला आहे. रशियातील कझान शहरात सीरियल ड्रोन (यूएव्ही) हल्ले करण्यात आले आहेत. कझान शहरातील तीन उंच इमारतींमध्ये हे हल्ले झाले. या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
कझानमधील उंच इमारतींवर UAV हल्ल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. वेगवेगळ्या दिशांनी येणारे किलर ड्रोन (यूएव्ही) हवेत इमारतींवर आदळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ड्रोन इमारतीवर आदळल्यानंतर मोठा स्फोटही होताना दिसत आहे. या हल्ल्याचा थेट आरोप रशियाने युक्रेनवर केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून हा ड्रोन हल्ला युक्रेनने केल्याचे म्हटले आहे.
घरांना आग लागली, लोकांना इमारतीतून बाहेर काढले
रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने कझान शहरावरील युक्रेनचे ड्रोन नष्ट केले आहे. त्याचवेळी, रशियन मीडिया एजन्सी स्पुटनिकला कझानच्या महापौर कार्यालयातून सांगण्यात आले आहे की ड्रोन हल्ल्यामुळे सोवेत्स्की, किरोव्स्की आणि प्रिव्होल्स्की या तीन जिल्ह्यांमध्ये घरांना आग लागली आहे. ड्रोन हल्ल्यामुळे ज्या इमारतींना आग लागली तेथे ऑपरेशनल सेवा सुरू आहेत. आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे. लोकांना इमारतीतून बाहेर काढण्यात येत असून तात्पुरता निवारा व अन्न दिले जात आहे.
२०२४ ची ब्रिक्स शिखर परिषद कझानमध्येच झाली...
कझान शहरावरील या हल्ल्याची जगभरात चर्चा होत आहे. कारण याच रशियन शहरात २०२४ साली ब्रिक्स परिषद झाली होती. या हल्ल्याचे वर्णन अमेरिकेतील 9/11 (वर्ल्ड ट्रेड सेंटर) हल्ल्याप्रमाणेच केले जात आहे.