शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine Russia War: रशियाविरोधात NATO आक्रमक, 30 सदस्य देश हल्ला करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 14:30 IST

Ukraine Russia War: रशियाने एकाच वेळी युक्रेनच्या 11 शहरांवर हल्ला करुन तेथील लष्करी तळांवर मोठा विध्वंस केला आहे. यानंतर आता ''नाटो'' रशियावर कारवाई करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळत आहे.

युक्रेनवर रशियाचे लष्करी हल्ले (Ukraine Russia Crisis)  सातत्याने सुरू असून, यामुळे युक्रेनमध्ये मोठा विध्वंस होत आहे. दरम्यान, युद्ध परिस्थिती पाहता नाटो (NATO ) रशियाविरोधात जोरदार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाटोचे 30 सदस्य देश रशियावर हल्ला करण्याची योजना आखत आहेत.

नाटो रशियाविरोधात कलम-4चा वापर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर रशियन सैन्याकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. रशियाने एकाच वेळी युक्रेनच्या 11 शहरांवर हल्ला करुन तेथील लष्करी तळांवर मोठा विध्वंस केला आहे. अशा स्थितीत नाटो रशियावर प्रत्युत्तराची कारवाई करण्याची योजना आखत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बोरिस जॉन्सन यांनी केला हल्ल्याचा निषेध इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला असून इंग्लंड आणि आमचे मित्र देश जोरदार प्रत्युत्तर देतील, असे म्हटले आहे. याशिवाय जर्मनीची राजधानी बर्लिन येथील ब्रॅंडनबर्ग गेटवरही युक्रेनच्या ध्वजासह एकता दाखवण्यात आली. हल्ल्यादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी चर्चा केली. यासह त्यांनी फ्रान्स आणि तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली.

तत्पूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याच्या रशियाच्या निर्णयाची निंदा केली. तसेच, अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र रशियाची जबाबदारी निश्चित करतील, असेही म्हटले. सात नेत्यांच्या गटाच्या बैठकीनंतर गुरुवारी अमेरिकन लोकांशी बोलण्याची योजना असल्याचे बायडेन यांनी सांगितले. बिडेन यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे की, "रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्वनियोजित युद्धाची निवड केली आहे ज्याचा लोकांच्या जीवनावर विनाशकारी परिणाम होईल. या हल्ल्यातील जीवितहानी आणि विध्वंसासाठी केवळ रशिया जबाबदार असेल, अमेरिका आणि त्याचे मित्र आणि भागीदार एकत्रित आणि निर्णायक पद्धतीने प्रत्युत्तर देतील."

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाrussiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय