शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Ukraine-Russia War: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडे उरले फक्त तीन पर्याय, पुढील 24 तास फार महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:14 IST

Ukraine-Russia War: रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवपर्यंत पोहचले आहेत, त्यामुळे रशियासमोर युक्रेन फार काळ टिकू शकणर नाही.

कीव:रशिया आणि युक्रेनमधील युद्ध शिगेला पोहोचले आहे. रशियाने युक्रेनवर ताबा मिळवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की(Ukraine President Volodymyr Zelenskyy) यांनी सैन्याच्या बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती समोर येत आहे. 

रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या आधी NATO देशांनी युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण, ऐनवेळी या देशांनी आपला शब्द पाळला नाही. यामुळे बलाढ्य अशा रशियासमोर युक्रेन युद्धात एकटा पडला. रशियाने युक्रनेच्या प्रमुख सैन्य स्थळांवर हल्ले केले, अनेक शहरांचा ताबा मिळवला. अणु उर्जा प्रकल्पही ताब्यात घेतला. या सर्व घडामोडीनंतर आता युक्रेनकडे तीन पर्याय उरले आहेत. 

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडे 3 पर्याय सध्याची परिस्थिती पाहता युक्रेन स्वबळावर रशियाशी जास्त काळ लढू शकत नाही. आम्ही रशियाला 96 तासांपेक्षा जास्त थांबवू शकणार नाही, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या राष्ट्रपती भवनात कधीही घुसू शकते. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडे तीन पर्याय आहेत. एकतर त्यांनी हार पत्करुन आत्मसमर्पण करावे, दुसरा म्हणजे देश सोडून पळ काढावा आणि तिसरा म्हणजे रशियन सैन्याच्या हाती अटक व्हावे.

आत्मसमर्पणाने प्रश्न सुटतीलअशा स्थितीत सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे युद्ध फार काळ चालणार नाही आणि युक्रेन लवकरच कोसळेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे युक्रेनने शरणागती पत्करावी असे अनेक संरक्षण तज्ञ म्हणत आहेत. युक्रेनने शरणागती पत्करली तर तेथील लाखो लोकांचे प्राण वाचतील. 

येत्या 24 तासांत परिस्थिती स्पष्ट होईलयेत्या 24 तासांत युक्रेनने आत्मसमर्पण केले नाही तर रशियन सैन्य राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवून युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करू शकते, असे मानले जात आहे. युक्रेनचे गृहमंत्री अँटोन गेराश्चेन्को यांनी देखील एक निवेदन जारी केले की शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी रशिया युक्रेनची राजधानी कीवला वेढा घालण्याची योजना आखत आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय