शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine-Russia War: युक्रेनच्या 'चेर्नोबिल' न्यूक्लिअर प्लांटमध्ये रेडिएशन वाढले, रशियाने मिळवलाय ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 16:11 IST

Ukraine-Russia War: ज्या अणु उर्जा प्रकल्पात 1986 मध्ये जगातील सर्वात मोठा अणु अपघात झाला होता, त्या प्रकल्पावर आता रशियाने ताबा मिळवलाय.

कीव: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने युक्रेनमधलील अनेक शहरांवर आणि महत्वांच्या ठिकाणांवर ताबा मिळवलाय. यातच आता रशियाने ताबा मिळवलेल्या युक्रेनमधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातून(Chernobyl nuclear power plant)  निघणाऱ्या रेडिएशनमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. 

युक्रेनने दावा केला आहे की, प्लांटमधून निघणाऱ्या रेडिएशनमध्ये नेहमीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सीएनएननुसार, न्युलियर प्लांटच्या अनेक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे. युक्रेनच्या ग्राउंड फोर्सेसच्या कमांडरच्या सल्लागार अॅलोना शेवत्सोवा यांनी फेसबुकवरुन सांगितले की, रशियन सैन्याने पॉवर स्टेशनचा ताबा घेतला आहे आणि कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवले आहे.

मोठा स्फोट झाला होतामिळालेल्या माहितीनुसार, या अणु उर्जा प्रकल्पात एप्रिल 1986 मध्ये जगातील सर्वात भीषण अणु अपघात झाला होता. त्यावेळी अणुभट्टीतील स्फोटानंतर संपूर्ण युरोपमध्ये रेडिएशन पसरले होते. हा प्लांट युक्रेनची राजधानी कीवपासून उत्तरेस 130 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या अणुभट्टीचा स्फोट झाला, त्यातील रेडिएशन रोखण्यासाठी त्याला संरक्षक उपकरणाने झाकण्यात आले होते. तसेच, प्लांटला निष्क्रीय करण्यात आले होते. पण, आता याच प्लांटमधून रिडिएशन निघत असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्राध्यक्षांनी दिली माहितीगुरुवारी झेलेन्स्की यांनी ट्विट केले होते की, '1986 ची शोकांतिका पुन्हा घडू नये म्हणून आमचे रक्षक आपले प्राणाची आहुती देत आहेत. अणु उर्जा प्रकल्पावर ताबा मिळवणे, ही संपूर्ण युरोपवर युद्धाची घोषणा असेल. रशियाने चेरनोबिल अणु प्रकल्प ताब्यात घेतला, तर जगात मोठा विध्वंस होण्याची शक्यता वाढेल.' 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय