शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine Russia Crisis: रशियन तेलावर बंदी! अमेरिकेसह जी ७ देशांनी घेतला मोठा निर्णय; यापुढे खरेदी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 05:50 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची G-7 नेते आणि झेलेन्स्की यांच्यासोबत भेट सुमारे तासभर बैठक चालली. युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल अमेरिकेने रशियावर नवीन निर्बंधही जाहीर केले.

रशियाने युक्रेनवर हल्ला करून आता दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. या काळात अमेरिकेने भारतासह जगाला रशियावरून धमकाविण्याचे काम केले होते. मात्र, स्वत: अब्जावधी बॅरल रशियन कच्चे तेल खरेदी केले होते. मात्र, आज या जी-७ देशांना भारताने आरसा दाखविल्यानंतर उपरती झाली आहे. 

रशियावर अमेरिकेसह युरोपने अनेक निर्बंध लादले आहेत. परंतू ते कच्चे तेल आणि गॅससाठी रशियावर अवलंबून असल्याने फारसे काही करू शकत नव्हते. रशियानेही बाजारभावापेक्षा डिस्काऊंट रेटमध्ये कच्चे तेल देण्यास सुरुवात केली होती. आता सव्वा दोन महिन्यांनी विकसित देशांची संघटना जी ७ ने रशियन कच्चे तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रशियाकडून तेल खरेदी टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा रविवारी या देशांनी संकल्प केला आहे. या देशाच्या नेत्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्याशीदेखील चर्चा केली व समर्थन दिले. या जी-७ देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि जपान हे देश आहेत. यापैकी सर्वच देश रशियाच्या कच्च्या तेलाचे उपभोक्ते आहेत. "राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मुख्य साधन नष्ट होईल आणि युद्ध लढण्यासाठी निधी संपेल.", असे या देशांनी रशियाचा तेल पुरवठा थांबवण्याच्या निर्णयावर म्हटले आहे.

मात्र, हे तातडीने केले जाणार नाही, टप्प्या टप्प्याने रशियाकडून तेल खरेदी कमी केली जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची G-7 नेते आणि झेलेन्स्की यांच्यासोबत भेट सुमारे तासभर बैठक चालली. युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल अमेरिकेने रशियावर नवीन निर्बंधही जाहीर केले. व्हाईट हाऊसने 9 मे 'विजय दिन' च्या आधी नवीन निर्बंधांची घोषणा केली. हा दिवस रशिया 1945 मध्ये नाझी जर्मनीचा पराभव म्हणून साजरा करतो. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाCrude Oilखनिज तेल