शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine-Russia Crises: पूर्व युक्रेनमध्ये एका कारमध्ये मोठा स्फोट; गॅस पाइपलाइनमध्येही आग, युद्धाची शक्यता वाढली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 08:25 IST

रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine-Russia Crises) तणाव वाढत आहे. हल्ला होणार नाही, असे दावे निश्चितपणे केले जात आहेत. मात्र जमिनीवर परिस्थिती याच्या उलट असल्याचं दिसून येत आहे.

रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine-Russia Crises) तणाव वाढत आहे. हल्ला होणार नाही, असे दावे निश्चितपणे केले जात आहेत. मात्र जमिनीवर परिस्थिती याच्या उलट असल्याचं दिसून येत आहे. आता शुक्रवारी पूर्व युक्रेनमध्ये एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेतलेल्या डोनेस्क या पूर्वेकडील युक्रेनियन शहरात ही घटना घडली. हे वाहन प्रादेशिक सुरक्षा प्रमुख डेनिस सिनेन्कोव्ह यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, पूर्व युक्रेनमधील गॅस पाइपलाइनच्या एका भागाला आग लागल्याची माहिती समोर आली.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यापासून, फॉल्स फ्लॅग मोहिमेअंतर्गत रशिया युक्रेनवर हल्ला करू शकतो असा इशारा पश्चिमेकडील अनेक देश सतत देत आहेत. सध्या या कार स्फोटाच्या घटनेसाठी रशिया युक्रेनच जबाबदार असल्याचं म्हणत आहे. त्याच वेळी, फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या दोन्ही भागातून मुले आणि महिलांचे पलायनही सुरू झाले आहे. युक्रेन लवकरच मोठा हल्ला करू शकतो, असे सांगून सर्वांना पाठवलं जात आहे. मात्र युक्रेनने हे दावे ठामपणे फेटाळले आहेत. तर दुसरीकडे युक्रेनने रशियावर आरोप केले आहेत.

अमेरिकेचा इशारासध्या परिस्थिती तणावपूर्ण असून रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. पुतिन युक्रेनवर हल्ला करू शकतात असे इनपुट्स अमेरिकेला मिळाले आहेत. ते युक्रेनच्या राजधानीवरही हल्ला करू शकतात. आपण युक्रेनच्या सीमेवर अमेरिकन सैन्य पाठवणार नाही. मात्र अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा असेल, असं बायडेन यांनी स्पष्ट केले. जर रशिया मागे हटलं नाही तर त्यांच्याविरोधात कठोर पावलं उचलली जातील. याशिवाय त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंधही लादले जातील. रशिया आताही मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो, असंही ते म्हणाले.

टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन