शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 20:59 IST

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत हवाई पट्टीवर उभी विमाने आगीच्या विळख्यात सापडून धूर उठत असल्याचे दिसते. दु

मागील ३ वर्षाहून अधिक काळ रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. आता या युद्धाने नवे वळण घेतले आहे. युक्रेनने रशियात आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने ड्रोन हल्ल्याद्वारे रशियाच्या सायबेरियातील एअरबेसला टार्गेट केले. ज्यात ४० हून अधिक रशियन लढाऊ विमाने उद्ध्वस्त झाल्याचा दावा आहे. रशियन सैन्य तळांवर झालेल्या या हल्ल्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत हवाई पट्टीवर उभी विमाने आगीच्या विळख्यात सापडून धूर उठत असल्याचे दिसते. दुसऱ्या एका व्हिडिओत हवेत उडणारा ड्रोनही नजरेस येत आहे. ज्यातून आग आणि धूर दिसत आहे. युक्रेनी पब्लिकेशन Pravda नुसार, युक्रेनने ऑपरेशन स्पायडरवेबमधून रशियात एक स्पेशल ऑपरेशन सुरू केले. त्यात रशियाच्या लांबच्या मारक क्षमतेतील विमानांना टार्गेट करण्यात आले. यु्क्रेनने रशियाच्या ४ एविएशन एअरबेसवर तैनात ४० लढाऊ बॉम्बर विमानांवर हल्ला केला. 

युक्रेनने त्यांच्या सीमेपासून ४७०० किमी आत घुसून रशियाच्या बेलाया एअरबेस, २००० किमी दूर ओलेन्या, ७०० किमी आत ड्यागिलेवो आणि ९०० किमी दूर असलेल्या ल्वानोवो एअरबेसवर ड्रोन हल्ला केला. युक्रेनने रशियातील या ड्रोन हल्ल्याला ऑपरेशन स्पायडरवेब असं नाव दिले. ज्यात रशियाच्या टीयू ९५, टीयू २२ एम ३ एअरक्राफ्टसह ए ५० हवाई वॉनिंग एअरक्राफ्टवरही हल्ला केला. युक्रेनने रशियाच्या ज्या विमानांवर हल्ला केला त्याची किंमत जवळपास २ बिलियन डॉलर म्हणजे २०० कोटी डॉलर इतकी होती. 

दरम्यान, रशियाने अलीकडेच युक्रेनी ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केला होता. त्यात १२ युक्रेनी सैनिक मारले गेले तर ६० जखमी झाले होते. या घटनेची जबाबदारी स्वीकारत युक्रेनच्या सीनियर मिलिट्री कमांडर यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला. मेजर जनरल मिखाइलो ड्रापाटी यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात वॉरटाइम लँड आर्मीचे प्रमुखपद स्वीकारले होते. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या सैनिकांचा मृत्यू झाला त्याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आपले १२ सैनिक ठार झाले, काही जखमी आहेत. या ट्रेनिंग बटालियनमध्ये युवांचा समावेश होता. त्यांना शिकायचे होते, मरायचे नव्हते असं जनरल मिखाइलो यांनी म्हटलं. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया