शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine Crisis : भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्याचा सल्ला, दूतावासाकडून सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 13:00 IST

Ukraine Crisis : मंगळवारी दूतावासाने यासंदर्भात एक सूचना जारी केली. यामध्ये भारतीय नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना युक्रेनमधून तात्पुरते निघून जाण्यास सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कीवमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना युक्रेन (Ukraine) सोडण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारी दूतावासाने यासंदर्भात एक सूचना जारी केली. यामध्ये भारतीय नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना युक्रेनमधून तात्पुरते निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे याआधीही अमेरिकेसह अनेक देशांनी आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे.

भारतीय दूतावासाने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, "युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीची अनिश्चितता लक्षात घेता, युक्रेनमध्ये राहणारे भारतीय नागरिक, विशेषत: ज्या विद्यार्थ्यांना राहण्याची गरज नाही, ते तात्पुरते युक्रेनमधून बाहेर जाण्याचा विचार करू शकतात. भारतीय नागरिकांना युक्रेन आणि युक्रेनमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे." याचबरोबर, पुढे म्हटले आहे की, "भारतीय नागरिकांना विनंती आहे की त्यांनी युक्रेनमधील त्यांच्या उपस्थितीबद्दल दूतावासाला कळवावे, जेणेकरून गरज पडल्यास त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. युक्रेनमधील भारतीयांना सेवा देण्यासाठी सामान्यपणे काम करेल."

ऑस्ट्रेलियानेही राजनैतिक अधिकाऱ्यांना दिले आदेशमॉस्को आणि कीवमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे ऑस्ट्रेलियानेही युक्रेनमधील आपले दूतावास कार्यालय रिकामे करण्यास सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पेन यांनी रविवारी घोषणा केली की, कीवमधील संपूर्ण कर्मचार्‍यांना युक्रेन सोडण्यास सांगण्यात आले आहे. दूतावासातील काम थांबले आहे आणि ते पश्चिम युक्रेनमधील सेव्हच्या तात्पुरत्या कार्यालयात पाठवण्यात आले आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियातील नागरिकांना तातडीने युक्रेन सोडण्याचा सल्लाही मारिस पेन यांनी दिला आहे.

16 फेब्रुवारी रोजी होणार युक्रेनवर हल्लारशिया आणि युक्रेनमधील वाढत्या वादामुळे युक्रेनमध्ये राहणाऱ्या लोकांची चिंता वाढली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर आपले 1 लाखाहून अधिक सैनिक तैनात केले असून ते कधीही युक्रेनवर हल्ला करू शकतात, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची एक फेसबुक पोस्टही समोर आली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, 16 फेब्रुवारी हा युक्रेनवरील हल्ल्याचा दिवस असेल. मात्र युक्रेन या दिवशी एकता दिवस साजरा करणार आहे. यासंबंधीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

युक्रेन आणि रशियामधील वाद काय आहे?युक्रेन आणि रशियामधील संपूर्ण वाद नाटोमध्ये सामील होण्याबाबत आहे. युक्रेन नाटोचा भाग होण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. नाटो अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि फ्रान्स सारख्या 30 देशांचा समावेश असलेला एक लष्करी गट आहे आणि रशियाचे अनेक शेजारी देश त्याचा भाग आहेत. रशियाची बाजू अशी आहे की जर युक्रेनही नाटोचा भाग बनला तर त्याला चारही बाजूंनी शत्रूंनी घेरले जाईल आणि अमेरिकेसारखे देश त्यावर वर्चस्व गाजवेल. तसेच, भविष्यात जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर तो नाटोमध्ये सामील झाला तरी 30 देश रशियाचे शत्रू होतील आणि युक्रेनला लष्करी मदत करण्यात पुढे असतील.

टॅग्स :russiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय