शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

खुन्नस देत ट्रम्पशी भिडले, पण आता घेतली माघार, युक्रेनमधील खजिना अमेरिकेला देण्यास झेलेन्स्की तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:58 IST

Ukraine-America Mineral Deal Update: व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भिडणारे झेलेन्स्की यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. तसेच अमेरिकेसोबत खनिजांसाठीचा करार करण्याची तयारी दर्शवली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये परवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमिर झेलेन्स्की यांच्यात वादावादी झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही खडाजंगी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भिडणारे झेलेन्स्की यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. तसेच अमेरिकेसोबत खनिजांसाठीचा करार करण्याची तयारी दर्शवली आहे. रविवारी लंडनमध्ये झालेल्या युरेपियन नेत्यांच्या बैठकीत युक्रेनला मिळालेल्या पाठिंब्यानंतर झेलेन्स्की यांनी याबाबत संकेत दिले आहे.  

झेलेन्स्की म्हणाले की, आम्ही खनिज करारावर स्वाक्षरी करण्याची सहमती दर्शवली  आहे. त्यामुळे आम्ही त्या करारावर स्वाक्षरी करण्यात तयार आहोत. जर दोन्ही पक्ष राजी असतील, तर करारावर सह्या केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. मात्र  दोन्ही पक्षांकडून तयार करण्यात आलेल्या कराराला कायम ठेवण्यास अमेरिका तयार आहे की, नाही याची माहिती मात्र समोर आलेली नाही.

अमेरिकेचे एक उच्चपदस्थ अधिकारी स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की, झेलेन्स्की यांना युद्ध सुरू ठेवायचं असेल, तर हा करार निरर्थक ठरेल. झेलेन्स्की यांनी रशियासोबतचं युद्ध संपुष्टात आणण्यापूर्वी युक्रेनच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान फ्रान्स आणि ब्रिटनने शांततेच्या प्रयत्नांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आग्रही भूमिका घेतल्याचं दिसत आहे. मात्र याबाबत झेलेन्स्की शंका उपस्थित केली आहे. 

दरम्यान, इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांनी सांगितले की, मी, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रौ आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमीर झेलेन्स्की यांच्यासोबत मिळून एक शांतता प्रस्ताव तयार करणार आहे. तसेच हा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर ठेवण्यात येईल. इंग्लंड आणि फ्रान्स आणि इतर दोन देश युक्रेनसोबत मिळून लढाई थांबवण्याच्या योजनेवर काम करणार आहोत. तसेच त्यानंतर या योजनेबाबत अमेरिकेशी चर्चा केली जाईल.   

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प