शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खात्यात अचानक आले १ कोटी रूपये, खर्चही केले; मग झालं असं काही की कपाळावर हात मारून घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 19:10 IST

Russell Alexander चं Barclays बॅंकेत खातं आहे. त्यांच्या खात्यात एक दिवस अचानक १ लाख १० हजार पाउंड इतकी रक्कम जमा झाली.

(प्रातिनिधिक छायाचित्र - business-standard.com)

तुमच्या खात्यात जर अचानक कुठून लाखो रूपये डिपॉझिट झाले तर विचार करा काय होईल. अर्थातच तुम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल. ब्रिटनमध्ये (UK) मध्ये राहणाऱ्या ५४ वर्षीय Russell Alexander सोबत असंच झालं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, Russell Alexander चं Barclays बॅंकेत खातं आहे. त्यांच्या खात्यात एक दिवस अचानक १ लाख १० हजार पाउंड इतकी रक्कम जमा झाली. जेव्हा त्यांना खात्यात इतकी मोठी रक्कम जमा झाल्याचा मेसेज मिळाला तर त्यांना धक्का बसला. ते लगेच बॅंकेत गेले आणि याबाबत सांगितलं. तिथे त्यांना सांगण्यात आलं की, ही रक्कम त्यांचीच आहे. त्यामुळे ते खर्च करू शकतात.

९ महिन्यांनी बॅंकेला कळाली चूक

साधारण ९ महिन्यांनंतर बॅंकेला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी Russell Alexander कडून ती रक्कम परत घेतली. पण तोपर्यंत त्यांनी त्यातील बरेच पैसे खर्च केले होते. त्यामुळे बॅंकेने त्यांच्या खात्यातील ६ हजार  पाउंडही जप्त केले.

Russell Alexander म्हणाले की, या घटनेनंतर ते रस्त्यावर आले. त्यांच्याकडे जीवन जगण्यासाठी पैसे शिल्लक राहिले नाहीत. ज्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या घरात शिफ्ट व्हावं लागलं. तिथे थंडीपासून वाचण्यासाठी त्यांच्याकडे हीटर आणि इतर सुविधाही नव्हत्या. Russell Alexander म्हणाले की, हे सगळं बॅंकेच्या निष्काळजीपणामुळे झालं.

बॅंकेने त्यांचे पैसे जप्त केले

ते म्हणाले की, त्या बॅंकेचे ते ४० वर्षापासून ग्राहक आहेत. खात्यात अचानक इतकी मोठी रक्कम आल्याने त्यांनी बॅंकेला सूचनाही दिली होती. त्यानंतरही बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विश्वास दिला की, ही रक्कम त्यांचीच आहे. त्यानंतर त्यांनी त्यातील बरेच पैसे खर्च केले. नंतर बॅंकेने ती रक्कम परत मागत त्यांच्याकडील पैसेही जप्त केले.

ते पुढे म्हणाले की, बार्कले बॅंकेने त्यांच्या जीवनाच्या भावी योजना हिसकावून घेतल्या. आता त्यांना त्यांची रक्कम परत मिळवण्यासाठी अनेक वर्ष मेहनत करावी लागेल. रसेलने बॅंकेच्या या बेजबाबदारपणामुळे त्यांच्या विरोधात केस ठोकली आहे. ज्यानंतर बॅंकेने त्यांना ५०० पाउंड नुकसान भरपाई देण्याची ऑफर दिली. पण ती त्यांनी स्वीकारली नाही.

कसा झाला खुलासा

यावर्षी सप्टेंबरमध्ये Russell Alexander यांच्या माजी बिझनेस पार्टनरने त्यांना संपर्क करून सांगितलं की,  चुकून ती मोठी रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाली. त्यानंतर रसेल यांनी पुन्हा बॅंकेला संपर्क केला आणि या घटनेबाबत सांगितलं. मग बॅंकेने १ लाख १० हजार पाउंडची रक्कम रसेलच्या माजी बिझनेस पार्टनरच्या खात्यात ट्रान्सफर केली. तोपर्यंत रसेल यांनी त्यातील बरेच पैसे खर्च केले होते. त्यामुळे बॅंकेने त्यांचे ६ हजार पाउंड जप्त केले. यामुळे रसेल बॅंकेवर नाराज आहेत. 

टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीय