शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

"शेवट नाही ही तर सुरूवात..."; ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून ऐतिहासिक ब्रेक्झिट करारावर स्वाक्षरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 11:02 IST

Brexit Deal : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली करारावर स्वाक्षरी. दोन्ही सदनांच्या मंजुरीनंतर हे विधेयक ब्रिटनच्या राणीकडे त्यांच्या मंजुरीसाठी पाठवलं जाणार आहे.

ठळक मुद्देब्रेक्झिट करारावर चर्चेसाठी बुधवारी बोलावण्यात आलं होतं संसदेचं विशेष अधिवेशनमुदतीपूर्वीच झालेल्या सहमतीनंतर ८० पानांचं विधेयक ब्रिटनच्या संसदेत सादर करण्यात आलं.

ब्रिटनच्या संसदेनं बुधवारी ब्रेक्झिट कराराला ७३ विरुद्ध ५२१ मतांनी मंजुरी दिली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपिय संघातून वेगळं होण्याअंतर्गत मुक्त व्यापार कराराला मंजुरी देण्यासाटी बुधवारी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. दरम्यान, बुधवारी जॉन्सन यांनी ब्रेक्झिट व्यापार करारावरही स्वाक्षरी केली. "ज्या करारावर मी आता स्वाक्षरी केली तो शेवट नसून नवी सुरूवात आहे. माझ्या मते ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये आपले मित्र देश आणि सहकारी देशांसोबत नव्या संबंधांना सुरुवात होईल," असं बोरिस जॉन्सन ब्रेक्झिट करारावर स्वाक्षरी करताना म्हणाले. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपीयन आयोगाच्या अधक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी यावर बुधवारी स्वाक्षरी केली. त्यानंतर हे दस्तऐवज रॉयल एअरफोर्सच्या विमानांनी लंडन येथे आणण्यात आले.युरोपियन युनियनपासून (ईयू) वेगळे होण्याअंतर्गत मुक्त व्यापार कराराला (एफटीए) संसदेची मंजुरी घेण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ख्रिसमसच्या सुट्टीनंतर बुधवारी संसदेचे अधिवेशन बोलावले होते. ब्रेक्झिटसाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीपूर्वीच झालेल्या सहमतीनंतर ८० पानांचं विधेयक ब्रिटनच्या संसदेत सादर करण्यात आलं. यापूर्वी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदारांनी यावर चर्चा केली. त्यानंतर हाऊस ऑफ लॉर्डमध्ये या विधेयकावर चर्चा करण्यात आली. दोन्ही सदनांच्या मंजुरीनंतर हे विधेयक ब्रिटनच्या राणीकडे त्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Englandइंग्लंड