शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी सुनक यांच्या आईने बनवलेली भारतीय बर्फी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कींनी चाखली, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 13:29 IST

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सुनक यांनी झेलेन्स्की यांना मिठाई खायला दिल्याचे दिसत आहे. ही बर्फी आईने भारतीय पद्धतीची बनवली असल्याचे सुनक सांगत आहेत. तसेच झेलेन्स्की भारतीय मिठाईचा आस्वाद घेताना दिसत आहे.  

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एका मुलाखतीत या घटनेचा खुलासा केला आहे. माझ्या आईने भारतीय मिठाई बनवली, ज्यात स्वादिष्ट बर्फीही होती, असे सुनक या मुलाखतीत बोलताना दिसत आहेत. बर्फी माझी आई खूप छान बनवते. जे मी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना खायला दिली. झेलेन्स्की यांना ती भारतीय गोड बर्फी खूप आवडली. ते खाल्ल्यानंतर त्यांनी खूप स्तुती केली.

खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या; भारतासाठी मोस्ट वाँटेड

ऋषी सुनक पुढे सांगतात, तेव्हा आम्ही दोघे बोलत होतो. त्यामुळे झेलेन्स्की यांना भूक लागली होती. अशा परिस्थितीत मी आईच्या माध्यमातून त्यांना मिठाई भेट दिली. ऋषी सुनक यांनी इंस्टाग्रामवर हा  व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये असे लिहिले आहे की, असं रोज होत नाही की,'वोलोडिमिर झेलेन्स्की तुमच्या आईच्या घरी बनवलेली मिठाई दररोज वापरून पाहतो असे नाही. 

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अलीकडेच त्यांच्या युरोपीय दौऱ्यात ब्रिटनला भेट दिली होती, तिथे त्यांनी रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनकडून नवीन शस्त्रे मिळवण्याबाबत  चर्चा केली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर त्यांची ही दुसरी यूके भेट होती. आपल्या भेटीदरम्यान झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे आभार मानले. 'आम्ही आभारी आहोत आणि येथे येणे माझ्यासाठी विशेषाधिकार आहे, असंही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. 

सुनक यांनी झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान सांगितले की, ब्रिटन युक्रेनला शेकडो हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे आणि अतिरिक्त मानवरहित हवाई प्रणाली प्रदान करेल, जे येत्या काही महिन्यांत वितरित केले जातील. एवढेच नाही तर युक्रेनला दिल्या जाणाऱ्या नवीन शस्त्रांमध्ये २०० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला असलेल्या ड्रोनचाही समावेश असल्याची घोषणा सुनक यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया