शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"युद्ध थांबायलाच हवं, पण आमचा अजूनही इस्रायलला पाठिंबा, कारण..."; ऋषी सुनक रोखठोक बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 16:37 IST

"दहशतवादी हल्ल्याला सहा महिने पूर्ण, इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात भयानक हल्ला" 

Rishi Sunak on Israel Hamas War in Gaza: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याच्या जवळपासही दिसत नाही. दोन्ही बाजून गाझा पट्ट्यात दररोज हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यात अनेक निष्पाप आणि निरपराध नागरिकांचे बळी जात आहे. मोठेच नव्हे तर नवजात बालकांपासून ते अल्पवयीन मुले-मुलींनाही या युद्धात नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. असे असताना या युद्धावरून जगातील काही बड्या देशांमध्येही दोन गट पडल्याची चिन्हे आहेत. हे बडे देश छुप्या किंवा उघडपणे दोन पैकी एका बाजूची पाठराखण करत आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडचेपंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे. इस्रायल हमास युद्ध थांबायलाच हवं यात कुठलंही दुमत नाही, पण सध्या सुरू असलेल्या युद्धात इंग्लंड इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे सुनक म्हणाले. यामागची कारणेही त्यांनी सांगितली.

"आम्ही कायमच इस्रायलला पाठिंबा देत राहू कारण हमासच्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असून तो हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न इस्रायल करत आहे. आपल्या नागरिकांची सुरक्षा करणे आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणे हा इस्रायलचा हेतू असून त्यात इंग्लंड अजूनही इस्रायलच्या पाठिंबा देत आहे. पण हे जरी खरे असले तरी या युद्धामुळे होणार रक्तपात पाहावत नाही. संपूर्ण इंग्लंडच्या जनता हा रक्तपात पाहून सुन्न झाली आहे," असे सुनक म्हणाले.

"इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेला संघर्ष हा विनाशकारी आणि भयानक आहे. या संघर्ष थांबायलाच हवा. हे युद्ध आता संपले पाहिजे. ओलीस ठेवलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका केली गेली पाहिजे. जमिनीवरून, हवेतून आणि पाण्याच्या मार्गातून अन्नधान्याची आणि इतर गोष्टींची मदत  युद्धग्रस्त भागात पोहोचवण्यात अनेक अडचणी येत आहेत. पण तरीही या मदतीचा ओघ असाच सुरु राहायला हवा आणि यात आणखी वाढ व्हायला हवी," असे सुनक यांनी सुचवले.

"गाझामधील हे आतापर्यंतचे सर्वात प्राणघातक युद्ध आहे, ज्यामध्ये सर्वाधिक रक्तपात झाला आहे. इस्रायलवर गाझा येथून हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाले, ज्यामुळे इस्रायलच्या आकडेवारीनुसार दक्षिण इस्रायलमध्ये 1,170 लोक मारले गेले. याशिवाय हमासच्या दहशतवाद्यांनी सुमारे 250 इस्रायली आणि परदेशी नागरिकांनाही ओलीस ठेवले होते. ज्यातील ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. आज ७ ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्याला सहा महिने पूर्ण होत आहेत. इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात भयानक हल्ला आहे. ज्यू लोकांचे दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात सर्वाधिक नुकसान झाले आहे," असे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलEnglandइंग्लंडprime ministerपंतप्रधानRishi Sunakऋषी सुनक