शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

"ब्रिटनला माझी गरज, भारत दौऱ्यावर येऊ शकत नाही", बोरिस जॉन्सन यांचा मोदींना फोन 

By मोरेश्वर येरम | Updated: January 5, 2021 18:21 IST

बोरिस जॉन्सन यांनी याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भारत दौऱ्यावर येण्याबाबत असमर्थता दर्शवली.

ठळक मुद्देबोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्दप्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोरिस जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आलं होतंब्रिटनमधील कोरोनाच्या हाहा:कारामुळे जॉन्सन यांनी घेतला निर्णय

नवी दिल्लीब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नियोजित भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनच्या उद्रेकामुळे जॉन्सन यांनी भारत दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

बोरिस जॉन्सन यांनी याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भारत दौऱ्यावर येण्याबाबत असमर्थता दर्शवली. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनासाठी यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. 

"बोरिस जॉन्सन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भारत दौऱ्यावर येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे", असं जॉन्सन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. 

"कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या वाढत्या प्रकोपामुळे काल रात्रीपासून देशात लॉकडाऊन जाहीर करावा लागला आहे. अशावेळी मी ब्रिटनमध्येच राहणं जास्त संयुक्तीक आहे. ब्रिटनला माझी गरज असून कोरोनाविरोधात लढा देणं महत्वाचं आहे", असं बोरिस जॉन्सन मोदींना फोनवर म्हणाले. उभय देशांमध्ये द्विपक्षीय संबंध याआधी प्रमाणेचं वृद्धींगत होत राहतील आणि कोरोनाच्या संकटात एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका अशीच कायम राहील, असंही जॉन्सन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRepublic Dayप्रजासत्ताक दिन