शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सापडला कोरोनाचा नवा आणि धोकादायक स्ट्रेन; जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

By कुणाल गवाणकर | Updated: December 22, 2020 11:00 IST

CoronaVirus News: नवा स्ट्रेन आढळल्यानं जगाची चिंता वाढली

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचं थैमान सुरूच आहे. काही देशांनी लसीकरणास सुरुवात केली आहे. त्यातच आता कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे संपूर्ण जग धास्तावलं आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन ७० पट अधिक धोकादायक आहे. हा विषाणू अतिशय वेगानं पसरत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आल्यानं अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंकोरोनाचा नवा स्ट्रेन म्हणजे नेमकं काय?कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला ब्रिटनच्या संशोधकांनी व्हीयूआय-२०२०१२/०१ असं नाव दिलं आहे. कोरोना विषाणूला अनेक टोक असतात. त्यातूनच तो माणसाला संक्रमित करतो. त्यानंतर त्याची साखळीच तयार होते आणि तो वेगानं पसरत जातो.कोरोनामुक्त झालेल्यांचे दात पडू लागल्यानं चिंतेत वाढ; डॉक्टरांसह सगळेच हैराण

नवा स्ट्रेन कधी आणि कुठे सापडला?बीबीसीच्या वृत्तानुसार, नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सप्टेंबर महिन्यात आढळून आला. नोव्हेंबरमध्ये लंडनमध्ये नव्या स्ट्रेननं बाधित झालेले काही रुग्ण सापडले. आतापर्यंत ११०० जणांना नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाची लागण झाली आहे.

आणखी कुठे कुठे आढळले रुग्ण? ब्रिटनसह इटलीतही कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. फ्रान्समध्येही या स्ट्रेननं शिरकाव केलेला असू शकतो, अशी शक्यता तिथल्या सरकारनं वर्तवली आहे. ब्रिटनहून ऑस्ट्रेलियात परतलेल्या दोघांमध्ये नवा स्ट्रेन आढळून आला आहे.सतत मास्कचा वापर करणं ठरू शकतं नुकसानकारक; डॉक्टरांनी सांगितले 'हे' दुष्परिणाम

नवा स्ट्रेन किती धोकादायक?विषाणूमध्ये होणारे बदल नैसर्गिक आहेत. कोरोनादेखील त्याला अपवाद ठरलेला नाही. विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यावर त्याच्या रचनेत बदल होत जातात. नव्या स्ट्रेनमुळे प्रादुर्भाव वेगानं वाढण्याची भीती आहे. हा स्ट्रेन ७० पट वेगानं पसरतो. त्यामुळे धोका अधिक आहे.

जगानं काय खबरदारी घेतली?नवा स्ट्रेनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी युरोपातील जवळपास सगळ्याच देशांनी ब्रिटनसोबत सुरू असलेली हवाई वाहतूक बंद केली आहे. सर्वप्रथम फ्रान्सनं हा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सर्व सीमा बंद केल्या. यानंतर जवळपास दोन डझन देशांनी ब्रिटनमधून येणारी विमानं रोखली.आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन; संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली, तज्ज्ञांचा दावा

भारतानं काय खबरदारी घेतली?दोन डझन देशांनी ब्रिटनसोबतची हवाई वाहतूक रोखल्यानंतर भारत सरकारनंदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला. आज रात्री १२ पासून ब्रिटनहून एकही विमानं भारतात येणार नाही. ३१ डिसेंबरपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू राहील. काल ब्रिटनहून भारतात दाखल झालेल्या आणि आज दाखल होणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल.

महाराष्ट्र सरकारनं काय पावलं उचलली?ब्रिटन आणि मध्य पूर्वेतून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करून त्यांना १५ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. तर इतर देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नव्या स्ट्रेनवर लस प्रभावी ठरणार?सुदैवानं कोरोनावरील लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरेल. वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर कोरोनाच्या रुपात काही बदल झाले. मात्र सध्या वापरात असलेल्या आणि संशोधनाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या सगळ्या लसी नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरू शकतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या