शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 09:57 IST

डॉरीस यांच्या माध्यमातून अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याची भीती

ठळक मुद्देब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची लागण; निवेदनातून दिली माहितीआरोग्य मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली कशी?; आरोग्य मंत्रालयाकडून शोध सुरूडॉरिस यांच्या माध्यमातून अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची भीती

लंडन: जगभरात कोरोनामुळे तब्बल साडे तीन हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून जवळपास शंभर देशांमध्ये कोरोनानं थैमान घातलं आहे. जगभरातले देश कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना करत आहेत. सर्वच देशांमधील सरकारं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पावलं उचलत असताना ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटिश खासदार आणि आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांनी मंगळवारी एक पत्रक जारी करुन कोरोनाची बाध झाल्याची माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी घरात कुटुंबातल्या इतर सदस्यांपासून दूर राहत आहे, अशी माहिती डॉरीस यांनी निवेदनातून दिली. डॉरीस यांना कोरोनाची बाधा नेमकी कुठे आणि कशी झाली, याचा शोध आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. नदीन डॉरीस या कोरोनाची लागण झालेल्या ब्रिटनमधल्या पहिल्या राजकीय नेत्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी डॉरीस यांना गेल्या काही दिवसांत अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून इतरांनाही कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांमध्ये डॉरीस यांनी शेकडो लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचाही समावेश आहे. नदीन शुक्रवारी आजारी पडल्या. त्याच दिवशी त्यांनी कोरोनाला विमा संरक्षण देण्यासंदर्भात कायदा करण्याचा निर्णय घेतला. नदीन यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांनी योग्य सल्ला आणि सहकार्य दिल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६ जणांनी जीव गमावला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना