शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 22:04 IST

ब्रिटनमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत असून, उद्या निकाल लागेल. यावेळी ऋषी सुनक यांच्याविरोधा कीर स्टार्मर निवडणुकीच्या मैदानात आहेत.

UK General Election : ब्रिटनमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या विरोधात लेबर पक्षाचे कीर स्टार्मर निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत देशभरातील 5 कोटी मतदार खासदारांची निवड करतील. विशेष म्हणजे, दरवेळेप्रमाणे यंदाही दोन्ही पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार हिंदूंना/भारतीयांना आकर्षित करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. 

ब्रिटीश निवडणुकीत हिंदू मतदारांची ताकद किती आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, मतदानाच्या काही दिवस आधी, म्हणजेच 28 जून रोजी लेबर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी लंडनमधील स्वामीनारायण मंदिरात पूजा केली. त्यानंतर लगेचच, 30 जून रोजी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनीदेखील मंदिरात पूजा केली. दरम्यान, ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे अंदाजे 18 लाख लोक राहतात. त्यामुळे दोन्ही पक्ष भारतांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या निवडणुकीत भारतीयांनी कोणाला मतदान केले?आकडेवारीवर नजर टाकली तर 2010 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 61 टक्के भारतीयांनी लेबर पक्षाला पाठिंबा दिला होता, फक्त 24 टक्के भारतीय कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या बाजूने होते. त्यानंतर, 2015 मध्ये 57 टक्के भारतीयांनी लेबर पक्षाला आणि 31 टक्के भारतीयांनी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला मतदान केले. मात्र, 2019 च्या निवडणुकीत दोघांमधील फरक लक्षणीयरीत्या कमी झाला. 30 टक्के भारतीयांनी लेबर पक्षाला आणि 24 टक्के भारतीयांनी कंझर्व्हेटिव्हला मतदान केले होते.

यावेळी भारतीय कोणाला पाठिंबा देत आहेत?एका सर्वेक्षणनुसार, यावेळी भारतीय मतदार सुनक यांच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षावर नाराज आहेत. 65% भारतीय मतदार सुनक यांच्या पक्षाच्या विरोधात आहेत. भारतीय मतदारांचे म्हणणे आहे की, सुनक यांच्या कार्यकाळात भारतीयांच्या बाजूने कोणतेही मोठे पाऊल उचलले गेले नाही.

निकाल कधी येईलदरम्यान, ब्रिटनमध्ये 6 महिन्यांपूर्वीच सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आज (4 जुलै) सकाळीच मतदानाला सुरुवात झाली. भारतीय वेळेनुसार 5 जुलै रोजी मतदानाची मतमोजणी सुरू होईल आणि त्याच दिवशी निकालही जाहीर होतील. ब्रिटनमध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान केले जाते. फक्त ब्रिटनचे नागरिकच नाही, तर भारतीय, पाकिस्तानी, ऑस्ट्रेलियन यांसारख्या देशांतील नागरिकही निवडणुकीत मतदान करतात.

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकElectionनिवडणूक 2024Internationalआंतरराष्ट्रीय