शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनच्या मंत्रिमंडळात दोन भारतीयांचा समावेश, महत्त्वाची खातीही मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:25 IST

ब्रिटनमध्ये निवडून आलेल्या व मूळ भारतीय वंशाचे असलेल्या दोन खासदारांचा पंतप्रधान तेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक तसेच सुएला फर्नांडिस अशी या दोन खासदारांची नावे आहेत. ते दोघे ३७ वर्षांचे आहेत.

लंडन : ब्रिटनमध्ये निवडून आलेल्या व मूळ भारतीय वंशाचे असलेल्या दोन खासदारांचा पंतप्रधान तेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक तसेच सुएला फर्नांडिस अशी या दोन खासदारांची नावे आहेत. ते दोघे ३७ वर्षांचे आहेत.ऋषी सुनक व सुएला फर्नांडिंस भारतीय वंशाचे असले तरी दोघांचा जन्म तिथेच झाला आहे. सुएला या मूळ गोव्याच्या रहिवासी आहेत.ऋषी सुनक हे २०१५ साली पार्लमेंटमध्ये निवडून आले होते. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षामध्ये त्यांच्याकडे उदयोन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. गृहनिर्माण, स्थानिक स्वराज्य संस्था या खात्याचे राज्यमंत्रीपदत्यांना पंतप्रधान तेरेसा मे यांनीदिले आहे. ब्रेक्झिेटशी संबंधित खात्याचे मंत्रीपद सुएला फर्नांडिस यांना देण्यात आले आहे. ब्रेक्झिटचा फर्नांडिस यांनी धडाडीने प्रचारकेला होता.ऋषी सुनक यांचे आॅक्सफर्ड व स्टॅनफोर्ड विद्यापीठांमध्ये उच्चशिक्षण झाले आहे. सुनक हे ब्रेक्झिटचे कट्टर समर्थक आहेत. युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्यास आपले व्यापारविषयक धोरण तो अधिक प्रभावीपणे राबवू शकेल असे मत ऋषी सुनक व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)शर्मांकडे रोजगार खातेराष्ट्रकुल परिषदेचे ब्रिटनने पुनरुज्जीवन करण्याची गरज असून भारतासारख्या देशांबरोबरचे बाजारपेठीय व व्यापारी संबंध ब्रिटनने सुधारायला हवेत असे परखड मत व्यक्त करणाºया सुएला फर्नांडिस यांनाही महत्त्वाचे खाते देऊन पंतप्रधान तेरेसा मे यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे. मूळ भारतीय वंशाचे एक आलोक शर्मा यांच्याकडे मे यांच्या मंत्रिमंडळात याआधी गृहनिर्माण खाते होते. त्यांना आता मंत्रिमंडळ फेरबदलात रोजगार खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे.

टॅग्स :Londonलंडन