होर्मुझ सामुद्रधुनीबाबत जागतिक तणाव वाढला असताना आता युरोपने एक मोठं धोरणात्मक पाऊल उचलले आहे. ब्रिटन आणि फ्रान्स यांनी मिळून हा महत्त्वाचा सागरी जलमार्ग खुला करण्यासाठी आणि जागतिक व्यापार सुरक्षित करण्यासाठी मल्टीनॅशनल प्लॅन तयार केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी ४० हून अधिक देशांची मोठी शिखर परिषद बोलावण्याची घोषणा केली आहे.
स्टार्मर यांनी म्हटलं की, होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहणे हे जगाच्या दृष्टीने नुकसानाचं आहे. जागतिक जल वाहतूक बंद झाली तर त्याचा थेट परिणाम महागाई आणि लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर होऊ शकतो. त्यामुळेच ब्रिटन आणि फ्रान्स यांनी मिळून असं कोऑर्डिनेटेड इंडिपेंडेंट आणि मल्टीनॅशनल प्लॅन तयार केला आहे ज्यातून युद्ध संपल्यानंतर हा सागरी मार्ग पूर्णपणे सुरक्षित आणि चालू राहू शकतो असं त्यांनी सांगितले.
ब्रिटन आणि फ्रान्सने घेतलेली ही भूमिका अशावेळी समोर आली आहे जेव्हा अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या नाकेबंदी इतर देशही सहभागी होतील असा दावा ट्रम्प यांनी केला परंतु ब्रिटनने स्पष्ट शब्दात ना ते नाकेबंदीचे समर्थन करणार, ना इराणविरोधात कुठल्याही सैन्य कारवाईचा भाग बनतील हे नाकारले आहे. आमचे लक्ष केवळ होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यावर आहे. आम्ही युद्धात सहभागी होणार नाही असं ब्रिटनने खुलासा केला आहे.
दरम्यान, ब्रिटन आधीच या क्षेत्रात हजर आहे. त्यांनी माइनस्वीपर जहाजे आखातात तैनात केली आहेत. ज्याचा मुख्य हेतू सागरी रस्ता सुरक्षित करणे आहे. ही तैनाती कुठल्याही युद्धाचा भाग होण्यासाठी नाहीत तर जागतिक शिपिंग वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आहेत असं ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले. ब्रिटन आणि फ्रान्सने घेतलेली भूमिका अमेरिकन धोरणापेक्षा वेगळी दिसत आहे. एकीकडे अमेरिका दबाव आणि सैन्य ताकद वापरून या समस्येवर तोडगा काढू इच्छिते तर दुसरीकडे युरोपियन देश जागतिक सहकार्याद्वारे यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जागतिक पातळीवर अनेक देश होर्मुझ स्ट्रेटवरून वाढणारा तणावाने चिंतेत आहेत. ते कुठल्याही सैन्य संघर्षात जाण्यास तयार नाहीत.
Web Summary : Britain and France are uniting 40 nations to secure the Hormuz Strait, aiming to ensure global trade flow. This initiative bypasses Trump's blockade strategy, focusing on cooperation and avoiding military conflict to stabilize the critical waterway.
Web Summary : ब्रिटेन और फ्रांस होर्मुज जलडमरूमध्य को सुरक्षित करने के लिए 40 देशों को एकजुट कर रहे हैं, जिसका उद्देश्य वैश्विक व्यापार प्रवाह सुनिश्चित करना है। यह पहल ट्रम्प की नाकाबंदी रणनीति को दरकिनार करती है, सहयोग पर ध्यान केंद्रित करती है और महत्वपूर्ण जलमार्ग को स्थिर करने के लिए सैन्य संघर्ष से बचती है।