इस्लामाबाद - पाकिस्तानचा ध्वज असणारी २ जहाजे 'शालिमार' आणि 'खैरपूर' जी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणने तयार केलेल्या 'सुरक्षित मार्गा'कडे जात होती. त्यांनी आता पर्शियन आखातात प्रवेश करण्यापूर्वीच माघारी फिरले आहेत. इस्लामाबादमधील अमेरिका-इराण चर्चा अयशस्वी झाल्यानंतर या दोन सुपरटँकरनी यू-टर्न घेतला आहे. हे दोन्ही टँकर सुरुवातीला पर्शियन आखातात प्रवेश करण्यासाठी होर्मुझच्या दिशेने जात होते. हा परिसर तेल पुरवठ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे परंतु सध्या तेथे अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती आहे. त्यामुळे आखातात प्रवेश करण्यापूर्वीच दोन्ही टँकर मागे फिरले आहेत.
जहाज वाहतुकीच्या डेटानुसार, इराणशी संबंध नसलेल्या तीन मोठ्या कच्च्या तेलाच्या टँकर्सनी ११ एप्रिलच्या रात्री उशिरा ओमानच्या आखातातून अरुंद जलमार्गातून प्रवास सुरू केला आणि १२ एप्रिलच्या सकाळी ते इराणच्या लारक बेटाजवळ पोहोचले. या दोन्ही टँकर्सवर पाकिस्तानी झेंडे फडकत होते. अमेरिका आणि इराण शांतता चर्चा किमान संपूर्ण दिवस चालेल आणि तोपर्यंत दोन्ही जहाजे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडू शकतील अशी पाकिस्तानला आशा होती परंतु तसं झाले नाही.
इराकला जाणारे'अजिओस फानुरिओस I आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दास बेटाकडे जाणारे पाकिस्तानचा ध्वज असलेले 'शालिमार' हे जहाज मागे फिरले. तिसरे जहाज 'व्हीएलसीसी मोम्बासा बी' देखील पुढे जात होते आणि इराणने पर्शियन आखातात प्रवेश करण्यासाठी लारक आणि केशम बेटांमधून स्थापित केलेल्या सुरक्षित मार्गातून इराणकडे जात होते. मात्र या जहाजांनी अचानक यू-टर्नचे कारण अज्ञात आहे. कारण यापूर्वी इराणने इराक आणि पाकिस्तान या दोघांनाही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली होती.
दरम्यान, या जहाजांनी अचानक वळण का घेतले हे माहिती नाही परंतु इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्यानंतरच या जहाजांनी अचानक आपला मार्ग बदलला याची पुष्टी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी जाहीर केली आहे, ज्यामुळे तणाव वाढण्याचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. यावरून परिस्थिती आणखी बिघडू शकते असे संकेत मिळतात.
Web Summary : Two Pakistani ships bound for Hormuz abruptly turned back after US-Iran talks in Islamabad collapsed. The tankers, initially heading towards the Persian Gulf, changed course amid heightened tensions and a potential US blockade, raising concerns about regional instability.
Web Summary : इस्लामाबाद में अमेरिका-ईरान वार्ता टूटने के बाद होर्मुज जा रहे दो पाकिस्तानी जहाज अचानक वापस मुड़ गए। फारस की खाड़ी की ओर जा रहे टैंकरों ने बढ़ते तनाव और संभावित अमेरिकी नाकाबंदी के बीच अपना मार्ग बदल दिया, जिससे क्षेत्रीय अस्थिरता की चिंता बढ़ गई।