शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेख हसीना यांच्यावर हत्येचे आणखी दोन गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 07:38 IST

बांगलादेशच्या माजी मंत्र्यांवरही उगारला बडगा 

ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना व त्यांच्या माजी मंत्र्यांवर आणखी दोन हत्या प्रकरणांत सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्या देशात गेल्या काही आठवड्यांत झालेल्या हिंसक निदर्शनांत शेकडो लोक ठार झाले होते. त्या निदर्शनांची धग इतकी वाढली की शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्या बांगलादेश सोडून भारतात रवाना झाल्या होत्या. 

१९७१च्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्याचा निर्णय शेख हसीना सरकारने घेतला होता. त्याला बांगलादेशच्या जनतेने तीव्र विरोध केला. ढाका येथील मिरपूर भागातल्या लिंटन हसन लालू ऊर्फ हसन व शेर-ए- बांगला या भागातील तारिक हुसैन या दोघांची हिंसाचारादरम्यान हत्या करण्यात आली होती. हसनच्या भावाने १४८ लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. 

त्यामध्ये शेख हसीना, माजी गृहमंत्री असदुइझमान खान कमाल, माजी पोलिस महानिरीक्षक अब्दुल्ला अल मामून यांचाही समावेश आहे. ४ ऑगस्ट रोजी मिरपूर येथे सुरू असलेल्या शांततामय निदर्शनांत हसन सहभागी झाला होता. मात्र शेख हसीना यांच्या अवामी लिग या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात तो ठार झाला असे या तक्रारीत म्हटले आहे.

तारिक हुसैन याची आई फिदूशी खातून हिने आपल्या मुलाच्या हत्येबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार माजी पंतप्रधान शेख हसीना, माजी रस्तेवाहतूक मंत्री ओबैदुल कादिर आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही अज्ञात व्यक्तींनी तारिक याची ९ ऑगस्ट रोजी गोळ्या घालून हत्या केली होती. 

अवामी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यावरही विविध गुन्हे शेख हसीना यांच्यावर विविध प्रकरणांत आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या त्या भारतात राहात आहेत. मात्र त्यामुळे भारताशी असलेले आमचे संबंध बिघडणार नाहीत, असा सावध पवित्रा बांगलादेशच्या हंगामी सरकारने घेतला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लिंग पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यावरही विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश