शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

Video: मलेशियामध्ये २ लष्करी हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर, १० जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 10:51 IST

मलेशियामध्ये नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर झाली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मलेशियामध्ये नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर  झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेव्हीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या सरावादरम्यान दोन्ही लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झाली. नौदलाची हा सराव  मंगळवारी लुमुट येथील रॉयल मलेशियन नेव्ही स्टेडियममध्ये सुरू होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये एक हेलिकॉप्टर दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडकताना दिसत आहे. 

ही दोन हेलिकॉप्टर Fennec M502-6 आणि HOM M503-3 होती. पहिले हेलिकॉप्टर क्रॅश होऊन स्टेडियमच्या पायऱ्यांवर पडले तर दुसरे स्विमिंग पूलमध्ये पडले.

Fact Check: व्हायरल फोटोत महेंद्रसिंग धोनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करतोय का? जाणून घ्या यामागचे सत्य

मलेशियाच्या नौदलाने या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. यात नौदलाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ते ५ मे दरम्यान होणाऱ्या लष्करी परेडसाठी हे हेलिकॉप्टर तालीम करत होते. नौदलाने या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या अपघातात ठार झालेले सर्व जण हेलिकॉप्टरचे क्रू मेंबर्स होते. मृतदेह ओळखीसाठी लुमुट एअर बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. ही घटना स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी ९.३२ वाजता घडली.

या घटनेची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे देशात वारंवार लष्करी हेलिकॉप्टर कोसळण्याच्या घटनांबाबत चिंता वाढली आहे. मागील महिन्यातच, मलेशियाच्या सागरी अंमलबजावणी एजन्सीचे हेलिकॉप्टर बचाव कवायती दरम्यान पुलाऊ अंग्सा, सेलंगोरजवळ क्रॅश झाले. 

ही घटना ५ मार्च रोजी घडली होती, यात पायलटसह दोन जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीही मलेशियामध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंगदरम्यान क्रॅश झाले होते. मात्र या घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुखरूप बचावले.

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाInternationalआंतरराष्ट्रीय