शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

दोन तास अख्ख्या शहराला वेठीस धरून लुटारूंनी घातला बँकेवर दरोडा; ब्राझिलमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 00:32 IST

पोलिसांनाही केले नामोहरम

रिओ दी जानेरिओ : ब्राझिलच्या क्रिसिमा शहरात एक डिसेंबरच्या मध्यरात्री दहा अत्याधुनिक गाड्यांमधून आलेल्या सुमारे ३० सशस्त्र दरोडेखोरांनी येथील एका बँकेतून इतकी मोठी रोख रक्कम लुटून नेली की, ती त्यांच्या गाड्यांमध्ये मावली नाही. त्यामुळे अनेक नोटा रस्त्यावर पडल्या होत्या. काही लोक त्या नोटा गोळा करताना दिसत होते. दरोडेखोरांनी दहशत पसरविण्यासाठी गोळीबार केला व सुरक्षा दलाच्या जवानांनाही नामोहरम केले. सुमारे दोन तास दरोडेखोरांनी या शहराला वेठीस धरले होते.

एखाद्या चित्रपटात शोभेल अशा थरारक पद्धतीने हा दरोडा घालण्यात आला. गोळीबाराच्या आवाजाने जागे झालेल्या क्रिसिमा शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या दरोडेखोरांनी बँकेची तिजोरी फोडताना स्फोटकांचा वापर केला. दरोडेखोर बँकेत घुसल्याची माहिती मिळताच पोलीस तसेच लष्कराचे जवान तातडीने घटनास्थळी गेले. तेव्हा लुटारुंनी त्यांच्यावरही गोळीबार केला. बँकेची तिजोरी फोडून तेथील रोख रक्कम आपल्यासोबत नेताना लुटारूंनी रस्त्यावरील काही लोकांना ताब्यात घेऊन आपली संरक्षक ढाल बनविले. त्यामुळे पोलिसांना दरोडेखोरांवर थेट प्रतिहल्ला करता आला नाही. त्यानंतर दरोडेखोर आपल्या कारमधून पसार झाले. 

घराबाहेर न पडण्याची नागरिकांना सूचनाक्रिसिमा शहरात लूटमार चालू असताना एकाही नागरिकाने घरातून बाहेर पडू नये, अशा सूचना पोलिसांकडून दूरचित्रवाहिनी तसेच सोशल मीडियातून देण्यात येत होत्या. ब्राझिलमध्ये संघटित टोळ्यांनी पोलीस फौजफाटा कमी असलेल्या लहान शहरांमध्ये  दरोडे घालण्याचे सत्र सुरू केले आहे.

 

टॅग्स :RobberyचोरीBrazilब्राझील