शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेमध्ये दोन बीयरच्या आधी बंदुका!

By admin | Updated: June 18, 2016 04:45 IST

‘तसे म्हटले तर अंगभर पीनट बटर फासून भल्या सकाळी माझ्या किचनमध्ये नग्न होऊन नाचण्याचा हक्क मला आहे. पण मी तसे करतो का? बंदुक विकत घेण्याचा हक्क आहे, म्हणून

- अपर्णा वेलणकर (थेट अमेरिकेतून)

सॅन फ्रान्सिस्को : ‘तसे म्हटले तर अंगभर पीनट बटर फासून भल्या सकाळी माझ्या किचनमध्ये नग्न होऊन नाचण्याचा हक्क मला आहे. पण मी तसे करतो का? बंदुक विकत घेण्याचा हक्क आहे, म्हणून शाळकरी मुलांपासून ओमर मतीनपर्यंत जो दुकानात जाईल, त्याला अंडरवेअर खरेदी करावी इतक्या सहजतेने या देशात गन मिळते. का? कशासाठी?’- सीएनएन वृत्तवाहिनीवर दोन मुलांचा बाप असलेला एक गोरा अमेरिकन कळवळून विचारत होता.सरसकट जिकडेतिकडे होत असलेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनांनी धास्तावलेले जाणते नागरिक, पैशाच्या राशीवर बसलेल्या ‘गन लॉबी’च्या हातातली खेळणी बनून कॅपिटॉल हिलवर गन कंट्रोलच्या विरोधात राजकारण करण्याचा आरोप झेलणारे रिपब्लिकन्स, बंदुक बाळगण्याचा घटनात्मक हक्क आणि त्याचे वर्तमानातले भीषण परिणाम या गर्तेत अडकलेले चर्चाविश्व आणि अमेरिकेतल्या ‘गन कल्चर’ला आळा घालण्यात टोकाचे अपयश आल्याचे स्वीकारून संतप्त हतबलता व्यक्त करणारे प्रेसिडेण्ट ओबामा... हे सध्याचे अमेरिकेतले चित्र आहे.ओरलॅण्डोच्या ‘पल्स’ नाईट क्लबमध्ये ४९ लोकांचा एकहाती जीव घेणाऱ्या ओमर मतीनने एक फरक मात्र घडवला आहे : प्रत्येकाच्या हाती बंदुक असली पाहिजे आणि अशा ‘कायदाप्रिय’ नागरिकांनी वेळ पडेल तेव्हा ‘मास शूटर्स’शी सामना करून त्यांना अडवले/मारले पाहिजे, असे तारे तोडणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पाऊल मागे घेऊन ‘विचार करण्याची तयारी’ दाखवली आहे.अर्थात जनमत काहीही असले तरी प्रेसिडेण्ट ओबामा यांच्या गेल्या सात वर्षांतील प्रयत्न विफल ठरल्यानंतर एवढ्या लवकर राजकीय परिस्थिती बदलेल, असे कोणीही म्हणताना दिसत नाही. बुधवार आणि गुरुवारी सिनेटमध्ये ‘नो फ्लाय, नो बाय’ विधेयकावर झालेली चर्चा वादळी असली, तरी राजकीय एकमताशी पोहोचण्यातले अपयश कायम आहे.एफबीआयच्या ‘वॉचलिस्ट’ वर असलेल्या ‘नो फ्लाय’ यादीतल्या संशयितांबरोबरच आणखी काही डेटाबेस मध्ये टाकलेल्या ‘संशयास्पद’ वर्तनाच्या नागरिकांना बंदुका विकत घेण्याला मनाई केली जावी, यासाठीचे हे प्रयत्न अपुरे आहेत, याबाबत डेमोक्रेट्समध्येही दुमत नाही. मात्र संभाव्य ‘गन कंट्रोल’ची ती (निदान) सुरुवात असू शकते, असा त्यांचा आग्रह आहे.ज्यांच्यावर कसलाही स्पष्ट आरोप नाही, गुन्हा सिद्ध झालेला नाही; त्यांना बंदुका विकत घेण्याला मनाई करणे म्हणजे नागरिकांचा स्वसंरक्षणाचा घटनात्मक हक्क हिरावणे आहे, अशी रिपब्लिकनांची प्रमुख हरकत आहे. त्याऐवजी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र मसुदा (अ‍ॅन्टीटेरर बिल) तयार केला असून, त्यात बंदुक विकत घ्यायला गेलेल्याला तीन दिवसांच्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच लिस्ट’वर ठेवावे, एफबीआयच्या ‘वॉच लिस्ट’मधल्या लोकांना शस्त्रखरेदीसाठी कोर्टाकडून मुभा मिळवण्याची सोय असावी, अशी प्रमुख कलमे आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्या गदारोळात ‘गुड गाय विथ अ गन थिअरी’ उचलून धरली असून चांगल्या लोकांच्या हाती शस्त्रे द्यावीच असा त्यांचा आग्रह आहे.ओरलॅण्डो हत्याकांडानंतर राष्ट्राला सामोरे जाताना प्रेसिडेण्ट ओबामा यांनी ‘...धीस इज माय सिक्स्टीन्थ टाईम’ असा हतबल उल्लेख केला. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराच्या एकूण १६ घटना घडल्या आणि हे घडणे आपण रोखू शकलो नाही, याबाबत त्यांनी संतप्त हतबलता व्यक्त केली. दुसऱ्याच दिवशी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार ओबामा यांच्या कारकीर्दीत अमेरिकेत सर्वाधिक बंदुका विकल्या गेल्याचे स्पष्ट झाले.अमेरिकेत हवी असेल त्याला बंदुक विकत घेता येते हे खरे, पण मुळात इतक्या लोकांना बंदुक खरेदी करावी असे का वाटते? याहीबद्दल अमेरिकन माध्यमांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. ‘आय फील नेकेड विदाऊट गन’ ही या चर्चेतल्या एका नागरिकाची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. एकीकडे असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेले जनमन आणि दुसरीकडे वर्चस्वाच्या उन्मादाने पेटलेले गट अशा दोन्ही टोकांना अमेरिकेत ‘गन’शिवाय जगणे अशक्यच वाटते. आधीच्यांना हटवून आपले वर्चस्व प्रस्थापित करणे, हे अमेरिकेच्या इतिहासाचे सार! त्यातूनच या भूभागात शस्त्र-संस्कृती रुजली आणि आधुनिकीकरणाबरोबर ती वाढत गेली, म्हणूनच लेटेस्ट आयफोन घ्यायला जाणाऱ्या गर्दीइतकीच गनची नवी ‘व्हर्जन’ आपल्या संग्रहात हवी, म्हणून धडपडणारेही इथे कमी नाहीत.फक्त ‘स्व’भोवतीच विणलेले आग्रही विचारविश्व, वर्चस्ववादाचा कडवा आग्रह आणि ‘आपल्यासारखे’ नसलेल्या अन्य गटांबद्दलचा अतीव अविश्वास या तीन घटकांचे अमेरिकेतल्या ‘गन कल्चर’शी जन्माचे नाते आहे, असे इथले तज्ज्ञ म्हणतात.... भारतातल्या विचारी मनांना यात काही साम्य जाणवल्यास तो योगायोग नसेल, हे खरेच!अमेरिका आणि बंदुका- अमेरिकेच्या राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातर्याच्या ‘फसर््ट अमेंडमेंट’ नंतर लगेचच्याच ‘सेकंड अमेंडमेंट’नुसार नागरिकांना कायद्याने शस्त्र बाळगण्याची परवानगी आहे.- लोकसंख्या (२0१५चा अंदाज) - ३२,१0,00,000- कायदेशीररित्या नागरिकांकडे असलेल्या बंदुकांची संख्या-२७,00,00,000- १00 नागरिकांमागे ८८.८ बंदुका- शाळा आणि कॉलेजांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या (२0१५) एकूण घटना-५९- गोळीबारात मारल्या गेलेल्यांची संख्या (२0१४) -१२,५७0स्वसंरक्षण ?... शौक!- अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये मद्य पिण्याचा परवाना मिळण्याच्या वयाआधी बंदुका खरेदी करता येतात.- नवा आयफोन घेण्यासाठी अमेरिकेत होणारी चढाओढ आणि बंदुकांची नवी मॉडैल्स घेण्यासाठीची अहमहमिका यात फरक नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.- एकाहून अधिक बंदुका शौक म्हणून बाळगणाऱ्यांची संख्या मोठी आहे.- अमेरिकेतली ‘गन लॉबी’ दिवसेंदिवस अधिक बळकट होण्याचे मुख्य कारण या व्यवसायात होणारी प्रचंड मोठी आणि दरवर्षी कित्येक पटीत वाढती उलाढाल.नो फ्लाय, नो बाय : म्हणजे काय?- दहशतवादी कारवाया / गटांशी संबंध असल्याच्या संशयावरून एफ. बी. आय.च्या वॉचलिस्टवर असलेल्यांना विमान प्रवासाला मनाई असते.- या ‘नो फ्लाय’ यादीत सध्या ६४,000 नावे आहेत. त्यात एफबीआयच्या अन्य स्क्रीनिंग डेटाबेसमधली नावे मिळवली, तर सुमारे ११ लाख लोक ‘आयडेंटीफाय’ होतात. संशयास्पद वर्तनाच्या या लोकांना बंदुका आणि अन्य शस्त्रे विकत घेण्याला मनाई करावी ( नो बाय), अशा आशयाचे विधेयक सिनेटमध्ये संमत व्हावे, यासाठी प्रेसिडेंट ओबामा आणि अन्य डेमोक्रेट नेत्यांचे प्रयत्न चालू आहेत.- ‘गन लॉबी’सकट रिपब्लिकनांचा या प्रस्तावाला विरोध असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या शस्त्र बाळगण्याच्या घटनात्मक अधिकारावर गदा येते, अशी त्यांची हरकत आहे.