शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! १४ वर्षांच्या दोन मुलींनी रचला ९ खुनांचा प्लॅन, पण ८ पानांची फाइल हरवली आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 15:14 IST

दोन १४ वर्षांच्या मुली ९ हत्या करण्याचा प्लॅन करु शकतात, यावर खरंतर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय.

दोन १४ वर्षांच्या मुली ९ हत्या करण्याचा प्लॅन करु शकतात, यावर खरंतर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. अमेरिकेतील फ्लोरिडामधील ही घटना आहे. हे प्रकरण जास्त धक्कादायक यासाठी आहे कारण ९ जणांची हत्या करण्याचा प्लॅन त्यांच्याच क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षांच्या दोन मुलींनी केला होता.  या दोन मुलींनी ८ पानांवर या हत्याकांडाचा संपूर्ण कट रचला होता आणि या प्रोजेक्टला नाव दिलं होतं ११/९. 

पोलिसही झाले हैराण

डीलेनी बार्न्स आणि सोलांज ग्रीन या दोघींना गेल्या आठवड्यात फ्लोरिडाच्या एवॉन पार्कमधून अटक करण्यात आली. दोघींवरही हत्येचा कट रचण्याचा आरोप आहे. चौकशीतून पोलिसांच्या हाती ८ पानांचा एक असा पुरावा मिळाला, जो वाचून पोलिसही हैराण झालेत. 'प्रोजेक्ट ११/९' नावाच्या या फाइलमध्ये या १४ वर्षांच्या भोळ्या दिसणाऱ्या मुलींनी हत्येचा पूर्ण कट रचला होता. तोही एखाद्या प्रोफेशनल किलरसारखा.

तीन भागात हत्येचा कट

पोलिसांच्या रिपोर्टनुसार, 'प्रोजेक्ट ११/९'च्या ८ पानांवर एवॉन पार्क मीडिल स्कूलच्या त्या ९ मुला-मुलींच्या नावाचा उल्लेख होता, ज्यांची हत्या होणार होती. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता. या हत्येचा कट तीन भागांमध्ये विभागण्यात आला होता. त्यांना फसवणे, हत्या करणे आणि त्यांचा मृतदेहांना ठिकाण्यावर लावणे. हे कागदावर स्क्रीप्टप्रमाणे लिहिलं होतं. 

हत्येवेळी काय परिधान करणार हेही ठरलेलं

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, डीलेनी आणि सोलांज यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये मृतदेह आणणे, दफन करणे, हत्या करताना दोघी काय परिधान करतील याचाही उल्लेख होता. खासकरुन हेही लिहिण्यात आलं होतं की, नखं आणि केसांचा थोडाही भाग कपड्याबाहेर असू नये. या हत्येच्या कटाचा खुलासा गेल्या बुधवारी या प्लॅनची फाइल मुलींकडून हरवल्यावर झाला होता. ही फाइल शाळेतील एका शिक्षकाला मिळाली होती. 

पोलिसांची एन्ट्री

फाइल हरवल्यावर डीलेनी आणि सोलांज दोघींनाही धक्का बसला. त्यांना असं म्हणतानाही ऐकण्यात आलं की, जर कुणाला फाइल मिळाली तर हा एक प्रॅंक होता असं सांगायचं. शिक्षकाने फाइल मिळतात शाळेच्या प्रशासनाला माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांना बोलवलं. 

पोलिसांनी यावर सांगितले की, 'याने काहीही फरक पडत नाही की, मुली आता याला प्रॅंकचं नाव देतील किंवा गंमतीचं. अशाप्रकारचं वागणं अजिबात गंमत नाही. ८ पानांच्या या फाइलमध्ये हत्येचा संपूर्ण कट हाताने लिहिण्यात आला होता. हा ९ मुला-मुलींच्या जीवनाचा प्रश्न आहे. ही गंमत नाहीये'.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयMurderखूनAmericaअमेरिका