शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 06:25 IST

Turkmenistan News: तुर्कमेनिस्तानमध्ये गेल्या ४५ वर्षांपासून धगधगत असलेली नैसर्गिक विवरातील आग मंदावली आहे. गुरुवारी येथील सरकारने सांगितले की आग आता मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. शांत आणि वाळवंटी भागातील कधीही न विझणाऱ्या या आगीने पर्यटकांना आकर्षित केले होते. 

अश्गाबात - तुर्कमेनिस्तानमध्ये गेल्या ४५ वर्षांपासून धगधगत असलेली नैसर्गिक विवरातील आग मंदावली आहे. गुरुवारी येथील सरकारने सांगितले की आग आता मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. शांत आणि वाळवंटी भागातील कधीही न विझणाऱ्या या आगीने पर्यटकांना आकर्षित केले होते. 

‘नरकाचा दरवाजा’ (डोअर टू हेल) या नावाने जगभर प्रसिद्ध असलेला हे विवर प्रत्यक्षात सोव्हिएत अभियंत्यांनी केलेल्या चुकीचा परिणाम आहे. १९७१ मध्ये शास्त्रज्ञ भूमिगत वायूसाठी खोदकाम करत होते. खोदकाम करताना हा खड्डा कोसळला आणि त्यातून विषारी वायू बाहेर पडू लागला. या वायू बाहेर पडू नयेत म्हणून तेथे उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांनी त्याला आग लावली, जी आजही धगधगत आहे. पण आता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या वायूंचा प्रवाह कमी झाल्यामुळे विवरातील आगीच्या ज्वाळा मंदावल्या आहेत.

मिथेनचा सर्वात मोठा उत्सर्जक असल्याचा दावाजगातील चौथ्या क्रमांकाचा वायू साठा असलेला तुर्कमेनिस्तान या वायू गळतीमुळे मिथेनचा सर्वात मोठा उत्सर्जक बनला. तथापि, तुर्कमेनिस्तानने हा दावा नाकारला आहे.मिथेनला हवामान बदल आणि ओझोन थराच्या ऱ्हासाचे एक प्रमुख कारण मानले जाते. मिथेन वायू साठवण्यासाठी आणि त्याचा ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी या विवराभोवती अनेक विहिरी देखील खोदण्यात आल्या आहेत. मात्र, हा प्रकल्प यशस्वी झाला नाही. 

३० मीटर खोल आणि ७० मीटर व्यासाचे विवरहे विवर तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबातपासून २६० किलोमीटर अंतरावर असलेल्या काराकुम वाळवंटाच्या मध्यभागी आहे. या विवराचा व्यास ६०-७० मीटर आहे, तर त्याची खोली ३० मीटर असल्याचे सांगितले जाते. त्यातून दुर्गंधी येते, परंतु असे असूनही, दरवर्षी लाखो पर्यटक हे नैसर्गिक आश्चर्य पाहण्यासाठी येतात. २०१९ मध्ये, स्थानिक नेते गुरबांगुली बर्दीमुखमेदोव यांनी विवराच्याभोवती कार रॅली आयोजित केली होती. 

टॅग्स :fireआगInternationalआंतरराष्ट्रीय