Turkey attacks Syria: इस्रायल आणि सिरिया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू होता. इस्रायलने सिरियाच्या संरक्षण मंत्रायलाची इमारत बॉम्बने आणि ड्रोनहल्ल्याने उद्ध्वस्त केली. त्यानंतर हा तणाव वाढला होता. पण सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शरा यांनी पलायन केल्यानंतर इस्रायल आणि सिरिया यांच्यात युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. असे असूनही सोमवारी सीरियाच्या अलेप्पोमध्ये जोरदार बॉम्बहल्ला झाला. हा हवाई हल्ला इस्रायलने केला नाही, तर सीरियाचा मित्रराष्ट्र समजल्या जाणाऱ्या तुर्कीने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या तळांना लक्ष्य करण्यात आले.
इस्रायलने सीरियातील ड्रुझ समुदाय राहत असलेल्या जागेवर हल्ला थांबवले. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर झाली. अशा परिस्थितीत, सीरियामध्ये शांतता स्थापित होत असतानाच, सोमवारी तुर्कीने सिरियावर हल्ला चढवला. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेनुसार, सोमवारी सीरियातील उत्तर अलेप्पोमध्ये तुर्कीच्या लढाऊ विमानांनी मोठा हवाई हल्ला केला. SDFची लपण्याची ठिकाणे या विमानांनी लक्ष्य केली. सध्या या हल्ल्यात किती लोक मारले गेले आहेत, याची माहिती समोर आलेली नाही.
तुर्की 'मित्र' असूनही सीरियावर बॉम्बस्फोट का करतंय?
मित्र राष्ट्र तुर्कीने सीरियावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात एसडीएफला लक्ष्य केले होते. यामागील कारण YPG असल्याचे मानले जाते, हा कुर्दिश लढवय्यांचा एक गट आहे जो एसडीएफचे नेतृत्व करतो. तुर्की, अमेरिका या संघटनेला दहशतवादी संघटना मानतात. वायपीजी या संघटनेच्या कारवायांना तुर्की थेट आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानते. तुर्की सीरियाच्या सीमेतील सुमारे ३० किमी क्षेत्र एसडीएफच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून ते सुरक्षित क्षेत्र घोषित करता येईल आणि सीरियन निर्वासितांना तेथे स्थायिक करता येईल. याशिवाय, SDFवर हल्ला करून तुर्की अमेरिकेवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहे.