शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घटत्या जन्मदरामुळे तुर्कस्तान हा चीन अन् युरोपीय देशांप्रमाणेच ‘वृद्धांचा देश’ होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 05:53 IST

Turkey Population News: जगाच्या नकाशावर एक  आर्थिक शक्ती म्हणून ओळख असलेल्या तुर्कस्थानात जन्मदरात इतकी मोठी घट झाली आहे की तो चीन आणि अनेक युरोपीय देशांप्रमाणेच वृद्धांचा देश होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या वाढवण्यासाठी तुर्कस्थान सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

इस्तंबूल  - जगाच्या नकाशावर एक  आर्थिक शक्ती म्हणून ओळख असलेल्या तुर्कस्थानात जन्मदरात इतकी मोठी घट झाली आहे की तो चीन आणि अनेक युरोपीय देशांप्रमाणेच वृद्धांचा देश होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या वाढवण्यासाठी तुर्कस्थान सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन नागरिकांना किमान तीन मुले जन्माला घालण्याचे आवाहन सतत करतात. मात्र परिस्थिती अगदी उलट आहे. टर्कस्टॅट या सांख्यिकी संस्थेच्या आकडेवारीनुसार देशाचा एकूण प्रजनन दर घसरून १.५१ इतका झाला आहे. कोणत्याही देशाची लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी प्रजनन दर किमान २.१ असणे आवश्यक असते. याचा अर्थ असा की आता तुर्कीची लोकसंख्या भविष्यात घटण्याची शक्यता अधिक आहे. ही परिस्थिती चीन आणि जपानने दशकांपूर्वी अनुभवलेल्या परिस्थितीसारखीच आहे. 

सरकारच्या योजना अपयशी का ठरत आहेत? जन्मदर वाढवण्यासाठी तुर्कस्थान सरकारने आर्थिक प्रोत्साहन योजना, करसवलती, तसेच काम करणाऱ्या महिलांसाठी मातृत्व रजा यांसारख्या योजना लागू केल्या. मात्र या सर्व उपाययोजनांनंतरही अपेक्षित परिणाम दिसून आलेले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून त्या देशात भीषण महागाई असून लिरा या चलनाची मोठी घसरण झाली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एकापेक्षा अधिक मुलांचा खर्च उचलणे आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे.

जीवनशैलीत बदल हेही महत्त्वाचे कारणतुर्कस्थानातील तरुणांमध्ये उशिरा विवाह करण्याकडे किंवा ‘चाइल्ड-फ्री’ राहण्याकडे कल वाढला आहे. शहरीकरणामुळे मोठ्या कुटुंबांची जागा लहान कुटुंबांनी घेतली आहे. महिलांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे विवाहाचे सरासरी वय  वाढले आहे. त्याने प्रजननक्षम कालावधी कमी होत आहे. या गोष्टी कायम राहिल्या तर येत्या २० ते ३० वर्षांत तुर्कस्थानला तरुणांची तीव्र कमतरता भासू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Turkey faces aging population crisis due to declining birth rates.

Web Summary : Turkey's birth rate decline mirrors China, Europe, risking an aging population. Despite government incentives like financial aid and maternity leave, the birth rate is falling. Economic hardship, delayed marriages, and women pursuing higher education contribute to this trend, potentially causing a future youth shortage.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय