शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

टर्की : 200 जणांचा बळी घेत टर्कीमधलं लष्करी बंड शमलं

By admin | Updated: July 16, 2016 18:23 IST

टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने उठाव केला आणि सरकारशी ईमानी असलेल्या गटाने त्यास विरोध केला. या धुमश्चक्रीत आत्तापर्यंत 200 जण ठार झाल्याचे वृत्त आहे

ऑनलाइन लोकमत अंकारा, दि. १६ -  तुर्कस्तान किंवा टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने उठाव केला आणि सरकारशी ईमानी असलेल्या गटाने त्यास विरोध केला. या धुमश्चक्रीत आत्तापर्यंत 200 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हे बंड अखेर शमलं असून 5 जनरल्स व 27 कर्नल्स यांच्यासह लष्करामधल्या तब्बल 2000 बंडखोरांना अटक करण्यात आली आहे. 1960 पासून लष्करातील अधिकाऱ्यांनी केलेला हा बंडाचा पाचवा प्रयत्न होता. मात्र, हे बंड पूर्णपणे मोडीत काढण्यात आलं असून जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या हातीच सत्तेची सूत्रं असल्याची ग्वाही सरकारनं दिलं आहे.

तुर्कस्तान येथील विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच लष्कराच्या या उठावामुले देशभरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लष्कराच्या बंडखोर गटाने उठाव करत सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा केला आहे, मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालटाचा डाव पोलिसांनी उधळून लावला. हेलिकॉप्टरमधून झालेल्या हल्ल्यात व सरकारशी बांधील सैन्याने केलेल्या विरोधात एकंदर 200 जण ठार झाले आहेत. इस्तंबुल व राजधानी अंकारा शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लष्कराच्या फुटीर गटाने काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांस बंदी बनवले आहे. राष्ट्राध्यक्ष तय्यीप अर्दोजेन यांनी परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणास असल्याचे सांगताना, टर्कीमध्ये लष्कराच्या हातात कधीही सत्ता जाणार नाही आणि लोकशाही मार्गाने आलेले सरकारच सत्तेत राहील याची ग्वाही दिली.

लोकांनी रस्त्यावर उतरून अर्दोजेन यांच्या सरकारला पाठिंबा दर्शवला

लष्करातील एका गटाने शुक्रवारी मध्यरात्री देशातील लोकशाही सरकारविरोधात उठाव केला, बंडखोरांनी हेलिकॉप्टरमधून केलेल्या हल्ल्यात १७ पोलिसांसह काही निरपराध नागरिकही मारले गेले असून, एकूण मृतांचा आकडा 200 झाला असून तो आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बंडखोर सैनिकांनी तुर्कस्तानच्या संसदेवरही बॉम्बहल्ला केला आहे, मात्र पोलिसांनी व इनामदार लष्करी गटांनी प्राणपणाने लढा देत हा हल्ला परतवून लावला आहे. सरकारच्या आदेशानुसार लष्कराने देशव्यापी प्रतिशोध मोहीम हाती घेतली असून तब्बल 1,563 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे दहशतवाद्यांशी लष्कर लडा देते त्याप्रमाणेच लष्करातल्या फुटीरांविरोधात कारवाई करण्यात येईल असे सरकारने जाहीर केले आहे.

बंडखोरांना लष्कराने नामोहरम केल्यानंतर लोकांनी असा आनंद व्यक्त केला

दरम्यान,  लोकशाहीला नुकसान पोहोचणाऱ्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत,  देशातील सध्या स्थिती नियंत्रणात आहे. लष्कराची ही चाल यशस्वी होणार नाही, देशातील सत्तापालट करण्याचा प्रयत्न करणा-यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असे पंतप्रधान येल्डरिन यानी म्हटले आहे. तर राष्ट्रपती इर्दोगन यांनी देशवासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टर्कीमधल्या सगळ्या राजकीय पक्षांनी विद्यमान सरकारच्या मागे ठामपणे उभे रहावे असे आवाहन केले आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या तय्यीप अर्दोजेन यांचेच सरकार सत्तास्थानी रहायला हवे अशी भूमिका ओबामा यांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरुप यांनी अंकारामधील भारतीय नागरिकांना तेथील परिस्थिती शांत होईपर्यंत नागरिकांना घराबाहेर न येण्याचे आवाहन केले आहे.  भारतीय नागरिकासांठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला असून तो  +905303142203 असा आहे. तर इस्तांबुल मधील नागरिकासाठी  +905305671095 हा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.