शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शटडाऊन संपविण्यासाठी ट्रम्प यांची तात्पुरत्या कराराला स्वीकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:46 IST

कायदेशीर स्वरुप; दोन्ही सभागृह आणि सिनेटमध्ये ठराव पारित

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे शटडाऊन संपविण्यासाठी तात्पुरत्या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दिला आहे. मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयाला डेमॉक्रॅट सदस्यांनी विरोध केल्यानंतर ट्रम्प यांनी राजकीय दबावासमोर झुकत हा करार मान्य केल्याचे मानले जाते.या समझोत्यामुळे ३५ दिवसांचे शटडाऊन संपविण्यावर तोडगा निघाला असला तरी प्रस्तावित सीमा भिंतीवरून निर्माण झालेला संघर्ष संपलेला नाही. ही भिंत बांधण्यासाठी ट्रम्प यांनी ५.७ बिलीयन अमेरिकन डॉलर देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. डेमॉक्रॅटस्नी त्याला विरोध केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे कर्मचाऱ्यांना पगार कपातीला सामोरे जावे लागले. गेल्या २२ डिसेंबरपासून सुरू झालेल्या शटडाऊनचा फटका आठ लाख फेडरल कर्मचाऱ्यांना बसला आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात मेक्सिकोलगत भिंत बांधण्याची घोषणा केली होती. १५ फेब्रुवारीपर्यंत सरकारला निधी पुरविण्याच्या कराराला ट्रम्प यांनी पाठिंबा दिला असून अमेरिकन संसद सदस्यांनी स्थलांतरणावर व्यापक करार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. संबंधित योजनेला दोन्ही सभागृह आणि सिनेटने शुक्रवारी ध्वनिमताने पाठिंबा दिला. या कराराला कायद्याचे स्वरुप प्राप्त झाले असून त्यावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसने दुजोरा दिला आहे.कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा....या तात्पुरत्या करारामुळे फेडरल कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून हे कर्मचारी पगाराविना काम करीत होते किंवा त्यांच्यावर नोकरी सोडण्याची पाळी आली होती. या निर्णयामुळे विमानसेवा उद्योगावरील ताण कमी झाला आहे. विमानतळ सुरक्षा आणि हवाई नियंत्रण सेवेत कर्मचाºयांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. रोज गार्डन येथे भाषण देताना ट्रम्प यांनी उपरोक्त कराराची घोषणा केली. मेक्सिको सीमेवर देखरेख ठेवणाºया होमलॅन्ड सिक्युुरिटीला निधी पुरविण्यासाठी माझी वर्षभर हाऊस आणि सिनेटमध्ये वाटाघाटी घडवून आणण्याची तयारी असून ते काम मी सुरू करणार आहे. गेल्या ३६ दिवसांपासून मी डेमॉक्रॅटस् आणि रिपब्लिकन सदस्यांचे मत ऐकून घेत आहे, असे ते म्हणाले.ट्रम्प यांचा पराभव?अमेरिकेत येणाºया बेकायदेशीर स्थलांतरितांना प्रतिबंध घालण्यासाठी मेक्सिको सीमेलगत भिंत बांधण्याची आवश्यकता असल्याचे ट्रम्प यांनी ठामपणे म्हटले असले तरी त्यांना त्यासाठी निधी मिळवता येणार नाही, हा त्यांचा पराभव असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. दुसरीकडे ही डेमॉक्रॅटस्ला दिलेली सवलत नाही. निधी न मिळाल्यास पुन्हा एकदा शटडाऊन किंवा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाऊ शकते असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाAmericaअमेरिका