शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या सुरूवातीलाच ट्रम्प यांचा झटका; वर्क व्हिसाबाबत घेतला मोठा निर्णय

By जयदीप दाभोळकर | Updated: January 1, 2021 10:31 IST

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि अमेरिकेत रोजगाराची संधी शोधणाऱ्या भारतीयांवरही मोठा परिणाम होणार आहे.

ठळक मुद्देअमेरिकेत रोजगाराची संधी शोधणाऱ्या भारतीयांवरही होणार परिणामजो बायडेन यांनी यापूर्वी केला होता विरोध, अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षाच्या सुरूवातीलाच एक मोठा झटका दिला आहे. अमेरिकेत कामासाठी जाणाऱ्या व्यक्तींना मिळणाऱ्या व्हिसाबाबत ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतलाय. स्थलांतरीतांना मिळणाऱ्या व्हिसावर दिलासा देण्यास ट्रम्प प्रशासनानं नकार दिला. गुरुवारी रात्री यासंदर्भात एक एक्सिक्युटिव्ह ऑर्डर जारी करण्यात आली. यामध्ये इमिग्रेसन आणि वर्क व्हिसावरील बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याचं म्हटलं आहे.ट्रम्प प्रसासनानं पहिल्यांदा या व्हिसावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी तात्पुरते निर्बंध घातले होते. त्यानंतर हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या  निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला होता. परंतु आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतल अमेरिकी नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.का घेतला निर्णय? अमेरिकेतील नागरिकांना अधिक नोकऱ्या आणि संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेतल्याचं सीएनएननं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं. ट्रम्प यांच्या मोठ्या निर्णयामुळे आता ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यांना आता मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तसंच रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांनाही आता मार्च महिन्यापर्यंत थांबावं लागणार आहे. कोरोना महासाथीमुळे अमेरिकन लोकांचे रोजगार जात आहेत. त्यामुळे आम्ही अमेरिकन लोकांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ असं ट्रम्प यांनी जून महिन्यात म्हटलं होतं.अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी यापूर्वीच आपल्या कॅम्पेनदरम्यान या निर्बंधांचा विरोध केला होता. परंतु आता राष्ट्राध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर ते हा निर्णय मागे घेतील का? हे आता पाहालं लागणार आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाVisaव्हिसाIndiaभारत