शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचे माजी अटर्नी कोहेन यांना कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 03:27 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी अँटर्नी व त्यांचे निवडणुकांपासून अनेक व्यवहार सांभाळणारे सहकारी मायकल कोहेन यांना न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी अँटर्नी व त्यांचे निवडणुकांपासून अनेक व्यवहार सांभाळणारे सहकारी मायकल कोहेन यांना न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अमेरिकी काँग्रेसला खोटी माहिती पुरविणे, ट्रम्प यांच्याशी असलेल्या प्रेमप्रकरणांची वाच्यता करू नये, यासाठी त्यांच्या दोन माजी प्रेयसींना पैसे देणे, असे गुन्हे कोहेन यांच्यावर दाखल करण्यात आले होते.आपल्याकडून जे कायदाबाह्य व चुकीचे वर्तन घडले त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असल्याचे कोहेन यांनी न्या. विलियम पॉली यांना बुधवारी सांगितले. हे सांगताना ते भावनाशील झाले होते. मॉस्कोतील संभाव्य ट्रम्प टॉवरच्या प्रकल्पाबद्दलही कोहेन यांनी अमेरिकी काँग्रेसला चुकीची माहिती दिली होती. त्या गुन्ह्यासाठी त्यांना आणखी दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.२०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचार मोहिमेसाठी ट्रम्प यांच्या वतीने जो खर्च करण्यात आला त्याची जबाबदारी कोहेन यांच्याकडे होती. तो निधी वापरतानाही बँकेमध्ये उलटसुलट व्यवहार तसेच करचुकवेगिरी केल्याचे उजेडात आले होते. शिक्षा कमी करण्यास नकारट्रम्प उमेदवार होते त्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता का, याची रॉबर्ट मुल्लर चौकशी करीत आहेत. त्यांनाही कोहेन यांची लबाडी लक्षात आली. ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्याला कारावासाची शिक्षा होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. ट्रम्प यांच्याबरोबर काम करताना आपली अवस्था कैदेत ठेवलेल्या व्यक्तीसारखी झाली होती, असे मायकल कोहेन यांनी न्यायालयाला सांगितले होते. शिक्षेचा कालावधी कमी करावा, अशी कोहेन यांच्या वकिलाने केलेली विनंती न्यायालयाने अमान्य केली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिका