शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा स्वदेशी बाणा, भारतीय उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 08:50 IST

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ माजली असून त्यामुळे भविष्यात जागतिक व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. 

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'नेशन फर्स्ट' या धोरणाला अनुसरून एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर मोठ्याप्रमाणावर कर लादला आहे. फक्त कॅनडा आणि मेक्सिको या दोन देशांना यामधून सूट देण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ माजली असून त्यामुळे भविष्यात जागतिक व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकन उद्योगांना काही चुकीच्या व्यापार धोरणांमुळे झळ सोसावी लागत आहे. स्टील आणि अॅल्युमिनियच्या आयातीवर कर लादल्याने या क्षेत्रातील अमेरिकन उद्योगांना चालना मिळेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, अनेक देशांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे पडसाद उमटू शकतात. भारतालाही याचा खूप मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भविष्यात जागतिक व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या नव्या धोरणानुसार पोलादावर 25 टक्के आणि अॅल्युमिनियमवर 10 टक्के इतका कर आकारला जाईल. येत्या 15 दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होईल. फक्त कॅनडा आणि मेक्सिको या दोन देशांना यामधून वगळण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाला रिपब्लिकन पक्षातील अनेक सिनेटर्स आणि अमेरिकेशी व्यापारी भागीदारी असणाऱ्या कंपन्यांनी विरोध केला आहे. मात्र, ट्रम्प यांनी आमचे सरकार अधिक निपक्षपाती आमि लवचिक होत असल्याचे म्हटले. निवडणुकीच्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार आमचे सरकार अमेरकिन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका