US Venezuela Conflict: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाविरोधात दंड थोपटले आहे. व्हेनेझुएलाविरोधात कारवाई करण्याच्या निर्णयापर्यंत ट्रम्प पोहोचले असून, अमेरिकेने आपल्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना केल्या आहेत. या युद्ध नौका तिथल्या किनाऱ्यावर तळ ठोकणार आहेत. एएफपी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिका ४००० जवान पाठवण्याच्याही तयारीत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेतील सूत्रांनी सांगितले एएफपीला सांगितले की, युद्ध नौका तैनात करण्याबद्दलची माहिती २० ऑगस्ट रोजी दिली गेली. तीन एजिस श्रेणीतील मिसाईल नष्ट करण्याची क्षमता असलेल्या युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने जात आहे. अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प ४००० सैन्य पाठवण्याची योजनाही तयार करत आहे.
व्हेनेझुएलाची आक्रमक भूमिका
अमेरिकेकडून युद्ध नौका पाठवण्याच्या निर्णयाआधी बोलताना व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो अमेरिकेच्या धमकीला उत्तर दिले जाईल. व्हेनेझुएलाही ४५ लाख जवान तैनात करणार, असे ते म्हणाले.
अमेरिका व्हेनेझुएला संघर्ष का वाढला?
डोनाल्ड ट्रम्प आक्रमक होण्याचं कारण आहे अमेरिकेत होत ड्रग्जची तस्करी. अमेरिका ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर दबाव टाकला जात आहे.
मादुरो यांना मागील दोन निवडणुकीत मिळालेल्या विजयाला अमेरिकेने स्वीकारलेले नाही. अमेरिका त्यांच्यावर कोकेन तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचा आरोप करत आली आहे. अमेरिकेने त्यांच्यावरील ड्रग्ज प्रकरणातील बक्षीस ५० मिलियन डॉलर केले आहे. अमेरिकेने मागील महिन्यातच या टोळीला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.