शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

India Pakistan Conflict: भारत, पाकच्या दोन अत्यंत हुशार नेत्यांनी युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा गौप्यस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:11 IST

Donald Trump On India Pakistan Tension: भारत व पाकिस्तानमधील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांमुळे मागील महिन्यात दोन्ही देशांतील संघर्ष थांबला, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

न्यूयॉर्क/इस्लामाबाद : भारत व पाकिस्तानमधील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांमुळे मागील महिन्यात दोन्ही देशांतील संघर्ष थांबला, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, ते नेते कोण हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही. संघर्ष थांबविण्यासाठी केलेल्या कामगिरीमुळेच मी मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये खास मेजवानी दिली, असे मात्र ते म्हणाले.

७ ते १० मे या कालावधीत भारत-पाकिस्तानमध्ये झालेला संघर्ष संपविण्यासाठी मी मध्यस्थी केली, असा दावा ट्रम्प यांनी याआधी अनेकदा केला आहे. ते म्हणाले की, भारत व पाकिस्तानमधील दोन नेत्यांच्या प्रयत्नांमुळे दोन देशांतील संघर्ष थांबला. मुनीर स्वत: युद्धाच्या मैदानात उतरले नाहीत. मात्र, त्यांची हा संघर्ष थांबविण्यास मदत झाली. मी मुनीर व मोदी यांचे आभार मानतो. (वृत्तसंस्था)

ट्रम्प यांना नोबेल द्या : मुनीरट्रम्प यांच्या खास निमंत्रणावरून अमेरिकेत गेलेले पाकिस्तानी लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना शांततेचा नोबेल देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील आण्विक युद्ध रोखले असल्याचे मुनीर यांनी नमूद केले. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या ॲना केली यांनी याची सांगितले की, ‘‘मुनीर यांनी नोबेलसाठी ट्रम्प यांच्या नामांकनाची शिफारस केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना व्हाइट हाऊसवर खास स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते.’’

ट्रम्प यांनी मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये खासगी जेवणासाठी आमंत्रित केले. मुनीर यांना दिलेल्या या मेजवानीबद्दलच्या मीम्सनी मात्र सर्वच समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातला असून, ते ट्रोल होत आहेत. जनरल मुनीर यांना भुकेले आणि असहाय्य दाखवण्यात आले आहे. पाकिस्तानी जनता दोन वेळच्या अन्नासाठी ताटकळत असताना, देशाच्या लष्करप्रमुखांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले जात आहे, अशी टीका त्यांच्यावर केली जात आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय