शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

जाताजाता ट्रम्प यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, "नशीबही बायडेन यांना साथ देवो हीच प्रार्थना"

By जयदीप दाभोळकर | Updated: January 20, 2021 08:51 IST

आज ट्रम्प यांचा कार्यकाळ होणार पूर्ण

ठळक मुद्देआज ट्रम्प यांचा कार्यकाळ होणार पूर्णजो बायडेन घेणार राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ आज पूर्ण होणार आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आज राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून अखेरचं अमेरिकेच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी ६ जानेवारी रोजी कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसक आंदोलनाचा निषेध केला. तसंच जो बायडेन यांना शुभेच्छा देत यशासाठी नशीबही त्यांचं साथ देवो अशी प्रार्थना, असं म्हणत सूचक इशाराही दिला. "संसंदेच्या परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर सर्वच जम भयभीत झाले होते. राजकीय हिंसाचार हा अमेरिकन नागरिकांच्या प्रत्येक बाबीवर होणारा हल्ला आहे. हे कधीही सहन केलं जाऊ शकत नाही," असं ट्रम्प म्हणाले. यादरम्यान त्यांनी विरोधकांना राजकीय द्वेषातून बाहेर येण्याचं आवाहनही केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणादरम्यान कोरोना विषाणूबाबतही भाष्य केलं. "चीन सोबत आपण नव्या रणनितीनुसार करार केले. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध झपाट्यानं बदलत होते. अमेरिकेतही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात होती. परंतु कोरोना विषाणूनं आम्हाला निराळ्या दिशेनं जाण्यास प्रवृत्त केलं," असंही ट्रम्प यांनी नमूद केलं.  आपल्या कार्यकाळाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, की "आपण सर्वांनी अमेरिकेला पुन्हा महासत्ता बनवण्यासाठी एक अभियान सुरू केलं. आम्ही जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था उभारली." ज्यानं कोणतीही नवी लढाई सुरू केली नाही असा दशकांमधील पहिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा आपल्याला अभिमान असल्य़ाचंही ट्रम्प म्हणाले. "आम्ही नव्या प्रशासनाचं स्वागत करतो आणि अमेरिकेला सुरक्षित, समृद्ध ठेवण्यासाठीही प्रार्थना करतो," असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी ट्रम्प यांनी फर्स्ट लेडी आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, तसंच ट्रम्प कुटुंबीयांचेही आभार मानले.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनPresidentराष्ट्राध्यक्षKamala Harrisकमला हॅरिसMelania Trumpमेलेनिया ट्रम्प