शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पना इतर देशांवर टॅरिफ आकारण्याचा अधिकार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:23 IST

अमेरिकेतील न्यायालयाने फटकारले, टॅरिफ रद्द करण्याचा आदेश नाही

वॉशिंग्टन: अमेरिकेतील एका केंद्रीय न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा फटकारले आहे. इतर देशांवर भरभक्कम टॅरिफ आकारण्याचा ट्रम्प यांना कायदेशीर अधिकार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दुसरीकडे न्यायालयाने ट्रम्प यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेला सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल कोणताही आक्षेप घेतला नाही.

न्यायालयाने म्हटले आहे की, जवळपास सर्वच देशांवर आयात शुल्क आकारण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी ट्रम्प यांना नाही. या माध्यमातून न्यूयॉर्क येथील एका व्यापारविषयक न्यायालयाने दिलेला निकाल केंद्रीय न्यायालयाने कायम ठेवला. 

अपिलाची दिली मुभा

याप्रकरणी ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा केंद्रीय न्यायालयाने दिली आहे. याबाबत ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, ‘हा निकाल कायम राहिला तर निश्चितपणे अमेरिकेसाठी विनाशकारी ठरेल.’  व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई म्हणाले की, ट्रम्प यांनी कायदेशीर मार्गाने सर्व निर्णय घेतले आहेत. 

स्थलांतरितांच्या हकालपट्टीला स्थगिती

- अमेरिकेत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या स्थलांतरितांच्या हकालपट्टीसाठी ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशांना एका केंद्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

- अशा लोकांच्या हकालपट्टीची मोहीम वेगाने राबवण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी २०२४ मध्ये निवडणूक प्रचारात दिले होते. ते त्यांनी अमलात आणले आहे. 

वाणिज्य मंत्रालयाने कसली कंबर

अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने निर्यातदारांना वाचविण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी तातडीने, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजनांवर काम सुरू आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे ४९ अब्ज डॉलर्स किमतीच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. हे प्रमाण अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीच्या ५५ टक्के आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय