शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर हल्ल्याची भीती; ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आणीबाणी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 10:52 IST

परकीय शत्रूंपासून बचाव करण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषीत केली आहे. परकीय शत्रूंपासून अमेरिकेच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सना वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी हे पाऊल उचललं आहे. यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षेत अडचणी आणणाऱ्या परदेशी टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरता येणार नाही. ट्रम्प यांनी याबद्दलच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी दिली. व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या आदेशात कोणत्याही कंपनीचं नाव नमूद करण्यात आलेलं नाही. मात्र हुवेई कंपनीला लक्ष्य करण्यासाठी ट्रम्प यांनी आणबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत आणीबाणी लागू होताच हुवेईनं प्रतिक्रिया दिली. यामुळे केवळ अमेरिकन कंपन्यांचं आणि नागरिकांचं नुकसान होईल, असं हुवेईनं म्हटलं. हुवेईच्या उत्पादनांचा वापर चीनकडून नजर ठेवण्यासाठी केला जात असल्याची चिंता अमेरिकेच्या कंपन्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. हुवेईचं अमेरिकेतलं अस्तित्व कमी करण्यासाठी अमेरिकेच्या व्यापार मंत्रालयानं आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. व्यापार मंत्रालयानं हुवेईचा समावेश 'एन्टीटी यादी'त केला. यामुळे अमेरिकन कंपन्यांमधलं तंत्रज्ञान ताब्यात घेताना हुवेईला अमेरिकन सरकारची परवानगी घ्यावी लागेल. यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये आधीच व्यापार युद्ध सुरू आहे. त्यात आता यामुळे भर पडणार आहे.  

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीनhuaweiहुआवे