शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

शरीरशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; तीन शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 16:06 IST

नोबेल पुरस्कार समितीकडून तीन शास्त्रज्ञांची नावं जाहीर

नवी दिल्ली: यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकशास्त्र विभागात तीन शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर झाला आहे. विल्यम जी. केलिन ज्युनियर, सर पीटर जे. रॅटक्लिफ आणि ग्रेग एल. सेमेंजा या तिघांना संयुक्तपणे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहे. पेशींकडून ग्रहण करण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा शोध लावल्यानं या शास्त्रज्ञांचा गौरव होणार आहे. नोबेल पुरस्कार समितीनं शरीरशास्त्रातील पुरस्कारासंबंधीची माहिती ट्विट करुन दिली. यंदा तीन जणांना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर झाला. पेशींची कार्यपद्धती आणि त्यांच्याकडून केलं जाणारं ऑक्सिजन ग्रहण याविषयी केलेल्या संशोधनासाठी तिन्ही वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराबद्दल सर पीटर जे. रॅटक्लिफ यांनी आनंद व्यक्त केला. पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी ते ईयू सिनर्जी ग्रँट ऍप्लिकेशनमधील त्यांच्या डेस्कवर काम करत होते.कोण आहेत पुरस्कारविजेते?अमेरिकन शास्त्रज्ञ विल्यम जी. केलिन ज्युनियर यांचा जन्म १९५७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांनी डरहम विद्यापीठातून एमडीची पदवी घेतली आहे. बाल्टिमोर के. जॉन हॉपकिंग्स विद्यापीठ आणि बोस्टनच्या दाना-फार्बर कर्करोग संस्थेतून त्यांनी इंटर्नल मेडिसीन आणि ऑन्कोलॉजीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. सर पीटर जे. रॅटक्लिफ यांचा जन्म इंग्लंडमधील लँकशायरमध्ये १९५४ मध्ये झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या गोन्विले आणि साइअस महाविद्यालयातून औषधांचा अभ्यास केला आहे. यासोबतच त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून नेफ्रोलॉजीचं प्रशिक्षण घेतलं आहे.ग्रेग एल. सेमेंजादेखील न्यूयॉर्कचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९५६ साली झाला. त्यांनी हावर्ड विद्यापीठातून बायोलॉजी विषयामधून पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी पेन्सिवेनिया विद्यापीठातून त्यांनी एमडी/पीएचडीदेखील घेतली आहे. 

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार