शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

अणुबॉम्ब चाचणीची शिक्षा, उत्तर कोरियावर युनोने लादले कठोर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 21:39 IST

तीन सप्टेंबर रोजी उत्तर कोरियाने सहावी आणि सगळ्यात मोठी अणू चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले आहेत.

संयुक्त राष्ट्रे, दि. 12 : तीन सप्टेंबर रोजी उत्तर कोरियाने सहावी आणि सगळ्यात मोठी अणू चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले आहेत. आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने एकमताने कठोर निर्बंध लादणारा ठराव संमत केला. या निर्बंधांचा मसुदा अमेरिकेने केला होता. उत्तर कोरियाला त्याच्या अणु कार्यक्रमापासून रोखण्यासाठी त्याच्या तेलाच्या आयातीला आणि कापडाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्बंधांचा समावेश आहे.

अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाला जग कधीही स्वीकारणार नाही, असे आज आम्ही म्हणत आहोत. आणि आज सुरक्षा परिषद म्हणत आहे की जर उत्तर कोरियाने आपला अणू कार्यक्रम थांबवला नाही तर तो थांबवण्याचे काम आम्ही स्वत: करू, असे संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यावेळी म्हणाल्या.

उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांच्या 15 सदस्यांच्या सुरक्षा परिषदेने सोमवारी निर्बंध लादणारा ठराव एकमताने संमत केला होता. उत्तर कोरियाने योग्य त्या गोष्टी कराव्यात यासाठी आम्ही प्रयत्न केले. चुकीच्या गोष्टी पुढेही सुरू ठेवण्याची त्याची क्षमता रोखण्यासाठी आम्ही आता कृती करीत आहोत, असे हॅले म्हणाल्या. उत्तर कोरियाला त्याच्या अणु कार्यक्रमासाठी मिळणा-या पैशांच्या क्षमतेवर घाव घालण्याचे काम संयुक्त राष्ट्रे करीत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

उत्तर कोरियाकडून होत असलेल्या संपूर्ण तेल आयातीवर बंदीसह अमेरिकेने मूळात कठोर निर्बंधांचा प्रस्ताव मांडला होता. परंतु निर्बंधांत कपात केल्यानंतरच उत्तर कोरियाचे मित्र देश रशिया आणि चीनच्या संमतीनंतर ठराव संमत झाला. हॅले म्हणाल्या की, उत्तर कोरियाचे अण्वस्त्रांच्या उभारणीचे प्रयत्न आणि त्याच्या चाचण्यांचा मुख्य आधार हा तेल आहे. वायू, डिझेल आणि जड इंधन तेलामध्ये 55 टक्के कपात केल्यामुळे उत्तर कोरियाला मिळणा-या तेलात ठरावाने 30 टक्के कपात केली आहे. या निर्बंधांमुळे उत्तर कोरियाच्या वार्षिक महसूलात 500 दशलक्ष किंवा त्यापेक्षाही जास्त अमेरिकन डॉलरची कपात होणार आहे.

आम्ही कुठेही आणि कधीही न्यूक्लियर टेस्ट करू- उत्तर कोरिया

आम्ही कुठेही आणि कधीची न्यूक्लियर टेस्ट करू शकतो, अशी धमकीच उत्तर कोरियानं अमेरिकेला दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं स्वतःची यूएसएस कार्ल विल्सन ही युद्धनौका कोरियन द्विपकल्पात तैनात केली आहे. त्यामुळे कोरियन द्विपकल्पात तणाव वाढला आहे. तसेच कोणत्याही दबावाला न घाबरता उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनीही अमेरिकेला युद्धासाठी तयार असल्याची धमकी दिली आहे. आम्ही कोणत्याही हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णतः तयार आहोत. आम्ही कधीही आणि कुठेही अण्वस्त्र चाचणी करण्यासाठी सक्षम आहोत. मात्र याचा निर्णय देशाच्या सर्वोच्च नेत्याला घ्यावा लागणार आहे, असं वक्तव्य उत्तर कोरियाच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. 

आमच्या तीन बॉम्बनी जगाचा होईल विनाश- उत्तर कोरिया

आमच्याकडे असंख्य अणुबॉम्ब असून, त्यातल्या केवळ तीन अणुबॉम्बनी संपूर्ण जगाचा नायनाट होऊ शकतो," अशी धमकी उत्तर कोरियाच्या पश्चिमी देशातील राजदूत आलेहांद्रो बेनोस यांनी दिली आहे. ते म्हणाले, उत्तर कोरियाला कोणीही हात लावू शकत नाही. जर असं झाले तर लोक बंदुका आणि मिसाइलनं देशाची सुरक्षा करतील. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब आहेत. त्यातील तीन अणुबॉम्ब हे पूर्ण जगाला नेस्तनाबूत करण्यासाठी पुरेसे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानातील इसिसच्या तळांवर अमेरिकेनं "मदर ऑफ ऑल बॉम्ब" टाकला होता. इसिसला दिलेल्या दणक्यानंतर अनेक देशांकडून उत्तर कोरियाला धमक्या येत आहेत. एका स्पॅनिश न्यूज साइटशी बोलताना बेनोस यांनी उत्तर कोरियाच्या युद्धविषयक अभ्यासाचीही माहिती दिली आहे.