शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मोदी सरकारच्या काळात कमी झाला भ्रष्टाचार; 'शेजाऱ्यां'चे हाल बेहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 11:15 IST

गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांमध्ये भारतातील भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मोदींच्या राज्यात म्हणजेच भारतात भ्रष्टाचार कमी झाल्याचा अहवाल आंतरराष्ट्रीय गैर सरकारी संस्था असलेल्या ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनलनं दिला आहे.भारतापेक्षा शेजारील देश असलेल्या चीन आणि पाकिस्तानमध्ये जास्त भ्रष्टाचार असल्याचंही या रिपोर्टमधील अहवालातून उघड

बर्लिन- गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मोदींच्या राज्यात म्हणजेच भारतात भ्रष्टाचार कमी झाल्याचा अहवाल आंतरराष्ट्रीय गैर सरकारी संस्था असलेल्या ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनलनं दिला आहे. मोदी सरकारनं भ्रष्टाचाराशी निपटण्यासाठी उचललेल्या पावलांना यश आल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसेच मोदींच्या या प्रयत्नांमुळे भारतातल्या भ्रष्टाचाराच्या क्रमांकातही सुधारणा झाली आहे. तसेच भारतापेक्षा शेजारील देश असलेल्या चीन आणि पाकिस्तानमध्ये जास्त भ्रष्टाचार असल्याचंही या रिपोर्टमधील अहवालातून उघड झालं आहे. ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनलच्या ग्लोबल करप्शन परसेप्शन इंडेक्स 2018नुसार, 180 देशांच्या यादीत भारत भ्रष्टाचाराच्या बाबतीत 78व्या स्थानी आहे. याच यादीत 2017मध्ये भारत 81व्या स्थानावर होता. 2011नंतर पहिल्यांदाच अमेरिका सर्वाधिक भ्रष्टाचारी असलेल्या 20 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. 2018च्या अहवालानुसार 39 या अंकासह चीन भ्रष्टाचारात 87व्या क्रमांकावर आहे. तर 38 अंकांसह श्रीलंका आणि इंडोनेशिया 89व्या स्थानी आहे. 33 अंकांसह पाकिस्तान हा भ्रष्टाचारात 117व्या स्थानावर आहे. 31 अंकांसह नेपाळ आणि मालदीव हे 124व्या स्थानावर आहेत. 29 या आकड्यासह म्यानमार 132व्या स्थानी आहे. 28 अंकांसह इराण, मॅक्सिको आणि रशिया भ्रष्टाचाराच्या बाबतीत 138व्या स्थानी आहेत. 26 अंकांसह बांगलादेश 149व्या स्थानी आहे. 18 अंकांसह व्हेनेझ्युएला आणि इराक 168व्या स्थानी आहे. तर 16 अंकांसह अफगाणिस्तान 172व्या स्थानी आहे. 14 अंकांसह उत्तर कोरिया 176व्या स्थानी आहे. 

  • भारताला मिळाले 41 अंक

या अहवालातील निर्देशांकानुसार प्रत्येक देशाला एक निर्धारित अंक देण्यात आला आहे. यात शून्य अंक असलेला सर्वाधिक भ्रष्टाचार देश, तर 100 अंक असलेला भ्रष्टाचारमुक्त देश असल्याचं नमूद केलं आहे. या रिपोर्टमध्ये भारताला 41 अंक देण्यात आले आहेत. 2017 आणि 2016मध्ये भारताला 40 अंक होते, तर 2015मध्ये हाच अंक 38 होता. 

  • सोमालिया सर्वाधिक भ्रष्ट देश

सोमालियात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं आहे. सोमालियाला 10 अंक देण्यात आला असून, हा देश या यादीत 180व्या स्थानी आहे. यादीत 178 स्थानी दक्षिण सूडान आणि सीरिया आहे. यमन, उत्तर कोरिया, सूडान, गिनी बिसाऊ, इक्वेटोरियल गिनी, अफगाणिस्तान आणि लिबिया हे देशही भ्रष्टाचारात अग्रेसर आहेत. 

  • डेन्मॉर्क सर्वाधित चांगला देश

निर्देशांकानुसार डेन्मॉर्कला पहिला आकडा बहाल करण्यात आला आहे, त्याचा अंक 88 आहे. म्हणजेच 180 देशांमध्ये डेन्मॉर्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी