शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

युरोपवर हल्ल्यासाठी ४०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण

By admin | Updated: March 25, 2016 01:44 IST

इसिसने (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया) युरोपमध्ये घुसून दहशतवादी हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना खास प्रशिक्षण दिले आहे. युरोपवर हल्ल्यासाठी इसिसने

पॅरिस : इसिसने (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया) युरोपमध्ये घुसून दहशतवादी हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना खास प्रशिक्षण दिले आहे. युरोपवर हल्ल्यासाठी इसिसने एकूण ४०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले आहे. पॅरिस आणि ब्रुसेल्समध्ये झालेले दहशतवाही हल्ले याचाच भाग आहेत. जास्तीतजास्त हानी करता यावी यासाठी दहशतवाद्यांना वेळ, ठिकाण आणि पद्धत निवडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पश्चिम देशांवर हल्ले करण्यासाठी सीरिया, इराकमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले गेले असण्याची शक्यता आहे. युरोपिअन आणि इराकच्या गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली आहे. पॅरिस हल्ल्यातील म्होरक्याने ९० दहशतवाही युरोपमध्ये घुसल्याची माहिती दिली होती. या दहशतवाद्यांनी छोट्या, मोठ्या प्रमाणात सगळीकडे नुकसान केले. पॅरिस हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार सालेह अब्देसलामला अटक केल्याने मोठे यश मिळाले आहे. मात्र त्याच्या अटकेनंतरही दहशतवाही हल्ले थांबलेले नाहीत. अटक केल्याच्या चार दिवसांतच ब्रसेल्स विमातळावर २ आणि मेट्रो स्थानकात १ असे एकूण ३ बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात ३४ जण ठार झाले तर, २५० नागरिक जखमी झाले. बेल्जियमने अधिकृतपणे जारी केलेल्या सीसीटीव्हीमध्ये संशयित तीन आत्मघाती हल्लेखोर टर्मिनलमधूल बाहेर पडताना दिसत आहेत. दोन हल्लेखोरांनी स्फोट घडवून आत्महत्या केली असून, एका हल्लेखोराकडील बॉम्ब न फुटल्याने त्याचा कट फसला.पॅरिस हल्ल्यानंतर अब्देसलाम ब्रुसेल्समधील घरी गेला होता. तिथे त्याने कट रचल्याची माहिती बेल्जिअमच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पॅरिस हल्ल्यानंतर अब्देसलामने अजून एका हल्ल्याची योजना आखली होती. त्याच्या अटकेमुळे फरक पडत नाही हे दाखविण्यासाठीच हल्ला केल्याचे सांगण्यात आले.