शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये विरोधाचा सूर कायम मात्र चर्चा यशस्वी होण्याची चिन्हे

By admin | Updated: September 9, 2014 04:17 IST

पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर इम्रान खान अडून बसल्याने पाकमध्ये विरोधाचा सूर टिकून असला तरी सरकार व आंदोलनकर्त्यांमधील चर्चा सफल होत असल्याचे सांगितले जात आहे.

इस्लामाबाद: पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर इम्रान खान अडून बसल्याने पाकमध्ये विरोधाचा सूर टिकून असला तरी सरकार व आंदोलनकर्त्यांमधील चर्चा सफल होत असल्याचे सांगितले जात आहे.पाकिस्तान तहरीक ए इन्साफचे (पीटीआय) प्रमुख असलेल्या इम्रान खान यांनी संसदेबाहेर आपल्या सर्मथकांशी बोलताना, जोपर्यंत पंतप्रधानांना राजीनाम्यासाठी राजी करीत नाही तोपर्यंत आपण परत जाणार नाही असे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या अनुयायांना दोन आठवडे धरणे देण्यास सांगितले आहे.पाकिस्तान अवामी तहरीक (पीएटी)चे मौलवी तहिरुल कादरी हेही खान यांच्या शिबिराजवळच आपली निदर्शने करीत आहेत. त्यांच्या सर्मथकांनी संसदेचा पार्किंग भाग रिकामा केला असून ते कॉन्स्टिट्यूशन एव्हेन्यूजवळ धरणे देत आहेत. सरकार व पीटीआयदरम्यानच्या चर्चेचा एक टप्पा रविवारी येथे पार पडला.या चर्चेत सकारात्मक बोलणी झाल्याचे सांगून अन्य काही महत्त्वाच्या मुद्यांवर बोलणी होणे व त्यांचे समाधान होणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. देशात उमटत असलेल्या विरोधाच्या सुरापासून देशाला सुरक्षित राखण्याबाबत दोन्ही पक्ष गांभीर्याने विचार करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरकार पक्षाचे नेतृत्व करणारे अर्थमंत्री इसहाक डार यांनी, अन्य मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा बैठक बोलावणार असल्याचे सांगितले. इम्रान खान यांनी सरकारवर आपला हल्ला चालूच ठेवीत, मागील निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यातील लाभार्थी असल्याचा आरोप अनेक नेत्यांवर केला. त्यांनी बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री डॉ. अब्दुल मलिकसह अन्य नेते या घोटाळ्यात सामील असल्याचे म्हटले. पाकमध्ये मलिक यांची गणना एका स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांमध्ये केली जाते. दोन आठवडे निदर्शने करण्याचा इम्रान खान यांचा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा त्यावर सर्व बाजूंनी टीका होते आहे व दुसरीकडे देश आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा पुराच्या संकटाला तोंड देत आहे.